शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल आणि लेबनॉनमध्ये ३ आठवड्यांचा युद्धविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:13 IST

इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीचा कालावधी तीन आठवड्यांनी वाढवण्यास दोन्ही देशांनी  संमती दर्शवली आहे.

वॉशिंग्टन: इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शस्त्रसंधीचा कालावधी तीन आठवड्यांनी वाढवण्यास दोन्ही देशांनी  संमती दर्शवली आहे. गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही घोषणा केली. एका दशकानंतर दोन्ही देशांमधील ही पहिलीच थेट चर्चा असून, मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश मानले जात आहे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीने हा युद्धविराम झाला आहे. 

ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या या बैठकीत इस्रायल आणि लेबनॉनच्या राजदूतांनी सहभाग घेतला. या आठवड्यातील ही दुसरी भेट होती. ही बैठक अतिशय सकारात्मक झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. यावेळी ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ उपस्थित होते. 

हिजबुल्लाचा विरोध

इस्रायल-लेबनॉन यांच्या युद्धविरामाला इराण पुरस्कृत ‘हिजबुल्ला’ या दहशतवादी गटाने विरोध केला आहे. गेल्या शुक्रवारी लागू झालेल्या सुरुवातीच्या युद्धविरामानंतर दोन्ही बाजूंनी अनेकदा नियमांचे उल्लंघन केले आहे. ट्रम्प यांनीही मान्य केले की, दोन्ही देशांना हिजबुल्लाच्या भूमिकेचा विचार करावा लागेल. 

इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले

बैरूत: युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही वेळेतच इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या एका मिसाईल लॉन्चरवर हवाई हल्ला केला तर प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाने रॉकेट डागले. 

‘नरक’ टिप्पणीमुळे ट्रम्पवर अमेरिकेत हल्लाबोल 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा उल्लेख 'नरक' (हेलहोल्स) असा केल्याने अमेरिकेत मोठे राजकीय वादळ उठले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली असून ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाला 'रिअॅलिटी टीव्ही शो' बनवले असून ते सोशल मीडियावर 'वांशिक गरळ' पसरवत असल्याचा आरोप केला आहे. हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीच्या डेमोक्रॅटिक सदस्यांनी 'एक्स' वर पोस्ट करत, अमेरिकेची जनता अनेक संकटांशी झुंजत असताना राष्ट्राध्यक्ष मात्र वांशिक गरळ ओकत आहेत, असे म्हटले आहे.   

भारतीय वंशाच्या खासदारांचा संताप अनावर

या मुद्द्यावर अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना, अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती यांनी संताप व्यक्त करत आम्हाला भारतीय वंशाचा अभिमान असून स्थलांतरितांच्या संघर्षाची जाणीव ट्रम्प यांना नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel, Lebanon Agree to Three-Week Ceasefire Amid Tensions

Web Summary : Israel and Lebanon agreed to a three-week ceasefire brokered by Trump. Hezbollah opposes it. Initial ceasefire violations occurred. Trump faced criticism for 'hellhole' comments regarding India and China, sparking outrage from Indian-American lawmakers.
टॅग्स :Warयुद्धInternationalआंतरराष्ट्रीयDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प