इराण-अमेरिका तणाव आता शिगेला पोहोचला आहे. इराणमधील हजारो नागरिकांच्या मोबाईलवर सोमवारी अचानक एक बेनामी मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली. पर्शियन भाषेत लिहिलेल्या या मेसेजमध्ये इराणी लोकांना अलर्ट करण्यात आले आहे. "अमेरिकन राष्ट्राध्यक्ष 'ॲक्शन' घेणारे व्यक्ती आहेत, थांबा आणि बघा," असा हा मेसेज आहे. महत्वाचे म्हणजे, इराण इंटरनॅशनल न्यूज एजन्सीने सरकारी माध्यमांच्या हवाल्याने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर केवळ कुटनीतीक दबावच वाढवला नाही, तर मध्यपूर्वेत नौदलाही तैनात केले आहे, जे आदेश मिळताच इराणवर क्षणाचाही विलंब न करता हल्ला करण्यास तयार आहे. ट्रम्प यांनी इराणवर मर्यादित लष्करी हल्ला करण्याचा विचार असल्याचे संकेतही दिले आहेत. तर दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी रविवारी सीबीएसला सांगितले की, आपण दोन्ही देशांमधील तणावावर राजनैतिक तोडगा शोधत आहोत. तसेच, अमेरिकन सैन्याने केलेल्या तयारीमुळे आपला देश कोणत्याही दबावाखाली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेनं लेबनॉनमधील दूतावास केले खाली -दरम्यान, युद्धाच्या वाढत्या धोक्यामुळे अमेरिकेने सोमवारी लेबनॉनमधील आपला दूतावासही खाली केला. अमेरिकेच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना इराणनेही इशारा दिला आहे की, जर हल्ला झाला तर त्याचे परिणाम वाईट होतील. दरम्यान, इराणचे म्हणणे आहे की, आपला कार्यक्रम सामान्य लोकांसाठी आहे; मात्र पाश्चिमात्य देशांना इराण अणू बॉम्ब बनवत असल्याचा संशय आहे.
Web Summary : Iranians received alarming messages referencing Trump's actions, amidst escalating US-Iran tensions. The US has increased diplomatic pressure and deployed naval forces. Iran dismisses pressure while seeking a diplomatic solution, but warns of consequences if attacked. The US also evacuated its Lebanon embassy.
Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच ईरानियों को ट्रंप की कार्रवाई का हवाला देते हुए चिंताजनक संदेश मिले। अमेरिका ने राजनयिक दबाव बढ़ाया और नौसेना तैनात की। ईरान राजनयिक समाधान तलाशते हुए दबाव को खारिज करता है, लेकिन हमले की स्थिति में परिणाम की चेतावनी देता है। अमेरिका ने लेबनान में अपना दूतावास भी खाली कर दिया।