शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प कोणाचेच होऊ शकत नाहीत, अमेरिकेसाठी तालिबानविरोधात १६०० अफगाण योद्धे लढले, आता पाकमध्येच अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:29 IST

अमेरिकेचा निर्वासित पुनर्वसन कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. यामुळे त्यांची तिकिटे काढलेली रद्द करावी लागली.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका आदेशाने अनेकांच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने जगभरातील विविध देशांत हजारो लोक अडकले आहेत. अमेरिकेचा निर्वासित पुनर्वसन कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. अमेरिकेने शरणग्रस्तांना मंजुरी देऊनही अनेकजण आता ना घरका ना घाट का अशा अवस्थेत आहेत. यातच १६०० अफगाणी योद्धे पाकिस्तानाच अडकले आहेत. 

तालिबानच्या विरोधात लढण्यासाठी सुमारे १६०० लढवय्यांनी अमेरिकेची मदत केली होती. अमेरिका सोडून जाताच तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा केला. यामुळे या योद्ध्यांनी पाकिस्तानात पळ काढला होता. तेव्हा पाकिस्तानला अमेरिकेने या योद्ध्यांना आपल्या देशात काही काळ राहण्यास द्यावे असे सांगत नंतर त्यांना आम्ही अमेरिकेत शरण देऊ असे आश्वासन दिले होते. बायडेन सरकारने देखील या शरणार्थिंना अमेरिकेत शरण देण्यास मंजुरी दिली होती. त्यांच्या विमानांची तिकिटेही काढण्यात आली होती. परंतू, आता ट्रम्प यांनी सर्वच रद्द केल्याने त्यांची तिकीटेही रद्द कराली लागली आहेत. 

ट्रम्प यांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांमुळे, अफगाण निर्वासितांना शक्य तितक्या लवकर अमेरिकेत पोहोचायचे होते. ट्रम्प काहीतरी आडमुठा निर्णय घेतील असे पाकिस्तानलाही वाटत होते. म्हणून अफगाण निर्वासितांना लवकर अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. सत्तेत येताच ट्रम्प यांनी निर्वासित पुनर्वसन कार्यक्रम ज्या पद्धतीने रद्द केला त्यामुळे अमेरिकेत आश्रय मागणाऱ्या पाकिस्तानी निर्वासितांसह इतरांना धक्का बसला आहे. 

१०००० लोक अडकले...विविध देशांतील १०,००० हून अधिक लोकांना अमेरिकेत आश्रयासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि त्यांची विमान तिकिटे पुढील काही आठवड्यांसाठी नियोजित होती, जी आता रद्द करावी लागत आहेत. ट्रम्प यांच्या आदेशानुसार, निर्वासित कार्यक्रम २७ जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार १२:१० वाजता लागू होईल आणि अंतिम मुदतीपूर्वी किती निर्वासित अमेरिकेत पोहोचू शकतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका