शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: WHO प्रमुखांच्या एका विधानानं जगाचं टेन्शन वाढलं; भारताला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 12:04 IST

CoronaVirus News: जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांच्या विधानामुळे चिंता वाढली

जिनिव्हा: जगातील कोरोना बाधितांचा आकडा पावणे दोन कोटींच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडा ७ लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. सध्याच्या घडीला जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही मोजक्या लसींच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात कोरोनावरील लस बाजारात येईल, अशी आशा वाटू लागली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस ऍडनम यांच्या एका विधानामुळे कोरोनावरील लस आली तरी कोरोना पूर्णपणे हद्दपार होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनावरील रामबाण उपाय कदाचित कधीच सापडणार नाही, असं ऍडनम एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले. भारतात कोरोनाचा संक्रमणाचा वेग अतिशय जास्त आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाविरोधात मोठा लढा द्यावा लागेल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. 'कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागेल. तीन महिन्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीची बैठक झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत पाच पटीनं वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडा तिपटीनं वाढला आहे,' अशी आकडेवारी ऍडनम यांनी सांगितली.टेड्रोस ऍडनम आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीचे प्रमुख माईक रायन यांनी सर्व देशांना कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, हात स्वच्छ करा आणि कोरोना चाचण्या करा, असं आवाहन त्यांनी केलं. लोकांनी मास्कचा आवर्जून वापर करावा. मास्क वापरणं म्हणजे लोकांच्या एकजुटतेचं प्रतीक व्हावं, असं टेड्रोस म्हणाले.सध्याच्या घडीला कोरोनावरील बहुतांश लसी तिसऱ्या टप्प्यात आहेत. त्यांच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. कोरोना विषाणूवरील लस लवकरच उपलब्ध होईल, अशी आम्हाला आशा आहे. मात्र सध्या तरी कोणताही रामबाण उपाय दिसत नाही आणि तसा उपाय कधी सापडेल, असं वाटत नाही, अशी भीती शब्दांत टेड्रोस यांनी व्यक्त केली. भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग अतिशय जास्त आहे. त्यामुळे त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असं ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना