शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
3
‘मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलंय, भाजपानं त्यांच्यावर…’, संजय राऊतांची बोचरी टीका 
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
5
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
6
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
7
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
9
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
10
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
11
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
12
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
13
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
14
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
15
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
16
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
17
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
18
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
19
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
20
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...

पाकिस्तानी भिकाऱ्यांची संख्या वाढली; सौदीला जाणाऱ्या विमानातून 16 भिकाऱ्यांना खाली उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 1:21 PM

देशातील परिस्थिती बिघडत असल्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक परदेशात भीक मागण्यासाठी जात आहेत.

Pakistan Begger: भारताच्या शेजारील पाकिस्तानची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. पाकिस्तानची गरिबी आणि तिथल्या लोकांची दुर्दशा कोणापासूनच लपलेली नाही. तिथल्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची सोय करणेही कठीण झाले आहे. त्यामुळेच पाकिस्तान आता भिकाऱ्यांचा निर्यातदार देश बनला आहे. ताजे प्रकरण पाकिस्तानच्या मुलतान विमानतळाचे आहे. विमानाने सौदी अरेबियाला जाणाऱ्या 16 भिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) ने दोन दिवसांपूर्वी मुलतान विमानतळावर सौदी अरेबियाला जाणार्‍या फ्लाइटमधून उमरा यात्रेकरूंच्या वेशातील 16 कथित भिकाऱ्यांना खाली उतरवले. पाकिस्तानी वृत्तवाहिनी डॉनने एफआयएच्या हवाल्याने सांगितले की, विमानातून उतरवलेल्या लोकांच्या गटात एक लहान मूल, 11 महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

उमराहच्या नावावर व्हिसा घेतला या लोकांनी उमराह व्हिसाद्वारे सौदी अरेबियाला जाण्यची योजना आखली होती. इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान, एफआयएच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची चौकशी केली, यावेळी त्यांनी आपण भीक मागण्यासाठी परदेशात जात असल्याची कबुली दिली. भीक मागून मिळणाऱ्या कमाईचा अर्धा भाग त्यांची व्यवस्था करणाऱ्या एजंटांना द्यावा लागतो, असेही त्यांनी उघड केले. एफआयएने या प्रवाशांना पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी मुलतान येथून अटक केली आहे.

पाकिस्तानी भिकारी परदेशात कसे जातात?परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी मीडियाला सांगितल्यानुसार, सुमारे 30 लाख पाकिस्तानी सौदी अरेबियामध्ये, 15 लाख यूएईमध्ये आणि 2 लाख कतारमध्ये आहेत. बहुतांश भिकारी सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये जाण्यासाठी हज यात्रेसाठी जारी केलेल्या व्हिसाचा फायदा घेतात. तिथे पोहोचल्यावर ते भीक मागू लागतात. मक्का मशिदीशिवाय अनेक धार्मिक स्थळांवरुन मोठ्या प्रमाणात लोकांना पकडण्यात आले आहे, त्यापैकी बहुतांश पाकिस्तानी नागरिक आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सsaudi arabiaसौदी अरेबियाBeggarभिकारीBeggerभिकारी