"माझ्या पत्नीला सांगा, मी तिच्यावर प्रेम करतो", विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा नियंत्रण कक्षात मेसेज; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:14 IST2026-02-11T13:11:32+5:302026-02-11T13:14:54+5:30
Gainesville Plane Crash Pilot Massage: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यामध्ये एका विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पण, विमान हवेत असताना आणि जीव वाचण्याची आशा सोडून दिल्यानंतर पायलटने नियंत्रण कक्षाला काय मेसेज पाठवला?

"माझ्या पत्नीला सांगा, मी तिच्यावर प्रेम करतो", विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा नियंत्रण कक्षात मेसेज; पण...
अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात गेन्सविले येथे एका विमानाचा अपघात थोडक्यात टळला. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इंजिनात बिघाड झाला. पायलटने विमान पुन्हा विमानतळावर नेण्याचा प्रयत्न केला, पण इंजिनमधून शक्ती तयार होणे बंद झाल्याने इमर्जन्सी लँडिंग केले गेले. पण, इंजिन बिघडल्याने पायलटने प्रयत्न केले, पण विमान कोसळणार असा विचार मनात आल्यानंतर त्याने शेवटचे शब्द उच्चारले. त्याचा संवाद नियंत्रण कक्षात रेकॉर्ड झाला आहे.
एका अपघातातून दोन पायलट थोडक्यात वाचले. एक इंजिन असलेल्या विमानाचे थेट वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सोमवारी (९ फेब्रुवारी) ही घटना घडली. रस्त्यावर आदळल्यानंतर हे विमान अनेक वाहनांना धडकले होते.
उड्डाण करताच इंजिन बिघडले
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेच इंजिन बंद पडले. विमान परत विमानतळावर नेण्यासाठी पायलटकडे पुरेसा वेळच नव्हता. इंजिन बंद पडल्याने विमान परत नेण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळणे बंद झाले होते.
"गेन्सविलेमधून उड्डाण केल्यानंतर आमचे इंजिन बंद पडले आहे आणि आम्ही परत आणण्यासाठी प्रयत्न करतोय", असा मेसेज पायलट थॉमस रॉजर्सने नियंत्रण कक्षाला पाठवला होता. "आम्ही सर्व प्रयत्न केले आहेत. आम्ही विमान परत विमानतळापर्यंत नेऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही हे विमान रस्त्यावरच उतरवत आहोत", असा मेसेजही त्यांनी पाठवला होता.
Small plane pilot said “tell my wife I love her” before making emergency landing and crashing into vehicles on a busy road
— Unlimited L's (@unlimited_ls) February 10, 2026
“Mayday!… We’re not going to make it. Please, tell my wife, Molly, I love her and my parents. I love them so much.”
A Hawker Beechcraft BE-36 made an… pic.twitter.com/jwemh2cboW
माझ्या पत्नीला, आईवडिलांना सांगा
विमानाचे इमर्जन्सी लँडिंग होण्यापूर्वीचा काही मिनिटाचा संवाद थरारक आहे. पायलट रॉजर हे विमानाला हवेत ठेवण्यात अयशस्वी ठरत होते. त्यानंतर त्यांना वाटलं की आता आपला मृत्यू निश्चित आहे.
विमान कोसळणार असे वाटत असतानाच पायलट थॉमस रॉजर यांनी नियंत्रण कक्षाला संदेश पाठवला. "आम्ही विमानाचे लँडिंग करू असे वाटत नाहीये. प्लिज माझ्या पत्नीला मोलीला सांगा. मी तिच्यावर प्रेम करतो. आणि माझ्या आईवडिलांना सांगा, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे."
पायलट थॉमस यांनी असा मेसेज पाठवला आणि त्यानंतर विमान रस्त्यावर आदळले. ते दुभाजकाला जाऊन धडकले आणि रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांना विमानाने धडक दिली. पण, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही आणि विमानातील दोन्ही पायलट वाचले. त्यामुळे रॉजर यांनी पाठवलेला शेवटचा सुदैवाने अखेरचा ठरला नाही.