शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

'तिला कामावरून काढा, नाहीतर ऑफिस पेटवून देऊ'; बांगलादेशात महिला पत्रकाराला तालिबानी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:56 IST

Bangladesh Violence: बांगलादेशातील कट्टरपंथी आणि आंदोलकांकडून माध्यमांची गळचेपी सुरूच असून, आता ग्लोबल टीव्ही बांग्लादेश या वृत्तवाहिनीला थेट धमकी देण्यात ...

Bangladesh Violence: बांगलादेशातील कट्टरपंथी आणि आंदोलकांकडून माध्यमांची गळचेपी सुरूच असून, आता ग्लोबल टीव्ही बांग्लादेश या वृत्तवाहिनीला थेट धमकी देण्यात आली आहे. "तुमच्या न्यूज हेड नाझनीन मुन्नी यांना तातडीने पदावरून हटवा, नाहीतर प्रथम आलो आणि द डेली स्टारप्रमाणेच तुमचे ऑफिसही पेटवून देऊ," असा इशारा काही तरुणांनी दिला आहे. या घटनेमुळे बांगलादेशातीलपत्रकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबर रोजी ७ ते ८ तरुणांच्या एका टोळीने ढाका येथील ग्लोबल टीव्हीच्या कार्यालयात प्रवेश केला. यावेळी त्यांनी वाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेतली आणि न्यूज हेड नाझनीन मुन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले. नाझनीन या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या समर्थक आहेत, असा दावा या तरुणांनी केला.

'४८ तासांत काढा, नाहीतर राखरांगोळी करू'

या तरुणांनी वाहिनीच्या व्यवस्थापनाला धमकावत सांगितले की, "नाझनीन मुन्नी अवामी लीगच्या समर्थक आहेत, त्यांना नोकरीवर ठेवता येणार नाही. त्यांना ४८ तासांत कामावरून काढून टाकण्याचे लेखी आश्वासन द्या." जेव्हा व्यवस्थापकीय संचालकांनी याला नकार दिला, तेव्हा आंदोलक अधिकच आक्रमक झाले. "आम्ही म्हणू तेच होईल. प्रथम आलो आणि द डेली स्टार सारख्या मोठ्या वृत्तपत्रांचे आम्ही काय केले ते तुम्ही पाहिलेच आहे, तुमचे ऑफिसही त्याचप्रमाणे पेटवून देऊ," अशी थेट धमकी त्यांनी दिली.

का केलं जातंय लक्ष्य?

आंदोलकांचा असा आरोप आहे की, ग्लोबल टीव्हीने भारतविरोधी युवा नेता शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूचे वार्तांकन योग्य पद्धतीने केले नाही. शरीफ हादी हा शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनातील प्रमुख चेहरा होता, ज्याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात पुन्हा एकदा अशांतता पसरली असून, त्याचा रोष आता पत्रकारांवर काढला जात आहे.

नाझनीन मुन्नी यांची व्यथा

या घटनेनंतर नाझनीन मुन्नी यांनी सोशल मीडियावर आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी म्हटले की, "हा केवळ मला दिलेला इशारा नसून स्वतंत्र माध्यमांना गप्प करण्याचा एक सुनियोजित कट आहे. ७-८ लोकांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन वैयक्तिक द्वेषातून मला कामावरून काढण्याची मागणी केली."

विद्यार्थी संघटनेचा हात झटकला

स्वतःला भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीचे सदस्य सांगणाऱ्या या तरुणांच्या कृत्यापासून संघटनेने आता अंतर राखले आहे. संघटनेचे अध्यक्ष रिफत रशीद यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या धमकावणीचे आम्ही समर्थन करत नाही आणि दोषी सदस्यांवर कारवाई केली जाईल. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशातील नामांकित वृत्तपत्राच्या कार्यालयांवर हल्ले करून ती पेटवून देण्यात आली होती. त्यानंतर आता एका महिला पत्रकाराला अशा प्रकारे लक्ष्य केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेवर टीका होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladeshi journalist threatened: 'Fire her or we'll burn the office'

Web Summary : A Bangladeshi news channel received threats to fire its news head, Naznin Munni, or face arson. Islamist hardliners accuse her of supporting the Awami League. The incident highlights growing threats to media freedom in Bangladesh.
टॅग्स :BangladeshबांगलादेशJournalistपत्रकार