काहीतरी मोठं घडणार...?; "आता अशी शस्त्रे काढू, जी तुम्ही कधी पाहिली नसतील...!", इराणच्या 'खूंखार' कमांडरची अमेरिकेला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 21:30 IST2026-02-28T21:29:52+5:302026-02-28T21:30:54+5:30

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मेजर जनरल इब्राहिम जबारी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे...

Something big is going to happen Now we will produce weapons like you have never seen before Iran commander threatens America | काहीतरी मोठं घडणार...?; "आता अशी शस्त्रे काढू, जी तुम्ही कधी पाहिली नसतील...!", इराणच्या 'खूंखार' कमांडरची अमेरिकेला धमकी

काहीतरी मोठं घडणार...?; "आता अशी शस्त्रे काढू, जी तुम्ही कधी पाहिली नसतील...!", इराणच्या 'खूंखार' कमांडरची अमेरिकेला धमकी

मध्यपूर्वेत जबरदस्त युद्ध पेटले आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर मोठा हल्ला केला. यानंतर इराणनेही पलटवार करत अमेरिकेच्या काही ठिकाणांवर आणि इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मेजर जनरल इब्राहिम जबारी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे. त्यांनी अशा शस्त्रांनी हल्ला करण्यासंदर्भात भाष्य केले आहे, जे अद्याप जगालाही माहीत नाहीत.

"अशी शस्त्रे काढू, जी तुम्ही कधी पाहिली नसतील" -
खरे तर, ही धमकी IRGC चे मेजर जनरल इब्राहिम जबारी यांनी दिली आहे. धमकी देताना ते म्हणाले, ट्रम्प यांना हे माहित असायला हवे की, आज आम्ही आमच्या जुन्या भांडारातील क्षेपणास्त्रे डागली. आणि आता लवकरच अशा शस्त्रांचे प्रदर्शन करून, जी अमेरिकेनं यापूर्वी कधीही बघितली नसतील.

दरम्यान अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनेही इस्रायलवर अत्यंत भीषण प्रतिहल्ला केला. इराणने आतापर्यंत ७० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) या हल्ल्याची पुष्टीही केली. तसेच संपूर्ण देशात हाय-अलर्ट जारी केला. इस्रायलची येरुशलेम, हाइफा आणि शेफेल्लाह यांसारखी मोठी शहरे इराणच्या निशाण्यावर आहेत. येरुशलेममध्ये सायरनच्या आवाजासह नागरिकांना तातडीने 'बॉम्ब शेल्टर'मध्ये जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

हूती आणि हिजबुल्ला युद्धाच्या मैदानात - 
या युद्धाचे स्वरूप आता अधिक व्यापक होत चालले आहे. इराणच्या समर्थनार्थ येमेनमधून हूती बंडखोरांनी लाल समुद्रात आणि इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाइल्स डागली आहेत. तसेच लेबनॉनमधून हिजबुल्लानेही हल्ले सुरू केले आहेत. 

अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या ५१ शाळकरी मुलींचा मृत्यू -
इस्रायल-अमेरिकेने इराणमधील साधारण ३० विविध ठिकाणांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केले. या लष्करी कारवाईदरम्यान इराणमधील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात ५१ विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच ६०हून अधिक मुली जखमी झाल्या आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी याला दुजोरा दिला आहे.

Web Title : मध्य पूर्व में बढ़ते तनाव के बीच ईरान ने अमेरिका को अज्ञात हथियारों से धमकाया

Web Summary : बढ़ते तनाव के बीच, ईरान ने कथित इजरायली-अमेरिकी हमलों के बाद अमेरिका को अभूतपूर्व हथियारों की चेतावनी दी। ईरान ने मिसाइल हमलों से जवाबी कार्रवाई की, जबकि हौथी विद्रोहियों और हिजबुल्लाह जैसे क्षेत्रीय अभिनेता संघर्ष में शामिल हो गए। हमलों में स्कूली छात्राओं सहित नागरिकों के हताहत होने की खबरें हैं।

Web Title : Iran Threatens US with Unknown Weapons Amidst Escalating Middle East Conflict

Web Summary : Amidst rising tensions, Iran warns the US of unprecedented weapons after alleged Israeli-US attacks. Iran retaliated with missile strikes, while regional actors like Houthi rebels and Hezbollah join the conflict. Reports allege civilian casualties, including schoolgirls, from the strikes.