शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

भारत-चीन तणावातच रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यंचा पंतप्रधान मोदींना फोन, 'या' विषयावर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 3:45 PM

विशेष म्हणजे भारत-चीन तणाव प्रचंड वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या नेत्यांत चर्चा झाल्याने, या चर्चेला अधिक महत्व आहे.

ठळक मुद्देवेळी दोन्ही नेत्यांत विशेष आणि विशेषाधिकार असलेली सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्याबोबररच  अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.विशेष म्हणजे भारत-चीन तणाव प्रचंड वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या नेत्यांत चर्चा झाल्याने, या चर्चेला अधिक महत्व आहे.यावेळी पंतप्रधा मोदी यांनी, दोन्ही देशाचे संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने वैयक्तीक पुढाकारासाठी पुतीन यांचे कौतुक केले.

नवी दिल्ली - भारत-चीन तणाव सुरू असतानाच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींना  फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांत विशेष आणि विशेषाधिकार असलेली सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्याबोबररच  अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. या शिवाय कोरोना महामारीच्या काळातही दोन्ही देशांतील संवाद कायम राहिला. यावरही दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. 

विशेष म्हणजे भारत-चीन तणाव प्रचंड वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या नेत्यांत चर्चा झाल्याने, या चर्चेला अधिक महत्व आहे. मात्र, या नेत्यांत चीनवर काही चर्चा झाली, की नाही. यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. यावेळी पंतप्रधा मोदी यांनी, दोन्ही देशाचे संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने वैयक्तीक पुढाकारासाठी पुतीन यांचे कौतुक केले. तसेच त्यांना द्विपक्षीय चर्चेसाठी भारतात येण्याचे निमंत्रणही दिले. दोन्ही देश या चर्चेसाठी तारीख निश्चित करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय एससीओ आणि ब्रिक्स संमेल यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मोदींनी पुतीन यांचे अभिनंदनही केले. 

चीनचे रशियाबरोबरचे संबंधही ठीक नाहीत. रशियाने नुकतेच चीनला हवे असलेले एस-400 सरफेस टु एअर मिसाईल सिस्टिमदेणे टाळले. दक्षीण चीन समुद्रावरील आपल्या दाव्याबरोबरच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरून चीनवर टीका होत असतानाच, रशियाने, असा निर्णय घेतल्याने त्याला विशेष महत्व आहे. रशिया आणि चीन यांच्या संबंधात 2014नंतर सुधारणा झाली होती.  मात्र, आता पुन्हा बीजिंग और मॉस्को यांच्यातील संबंध दुरावल्याचे दिसत आहे. रशियाने नुकताच आपल्या एका आर्कटिक रिसर्चरवर विश्वासघाताचा आरोप करत, त्याने अत्यंत महत्वाची माहिती चीनला दिल्याचे म्हटले होते.

चीनच्या तुलनेत भारताला अधिक महत्त्व -पूर्व लडाखमधील तणाव गेल्या चार महिन्यांपासून कायम असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच रशियाला भेट  दिली. विशेष म्हणजे यावेळी चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहीदेखील रशिया दौऱ्यावर होते. मात्र, फेंगही यांच्या तुलनेत सिंह यांना व्यासपीठावर अधिक प्राधान्य मिळाले. सिंह यांचे रशियात झालेले स्वागत पाहता यजमान देशाने चीनच्या तुलनेत भारतासोबतच्या मैत्रीला अधिक महत्त्व दिल्याची चर्चा होती. 

या दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विविध बैठकांना उपस्थित होते. यावेळी वेई फेंगही सगळ्याच ठिकाणी त्यांच्या मागून चालताना दिसत होते. सिंह आणि फेंगही एकाचवेळी सैन्य स्मारकाजवळ पुष्पचक्र वाहण्यासाठी गेले. त्यावेळी रशियाच्या लष्कराचे अधिकारी सिंह यांच्या दोन्ही बाजूंना उपस्थित होते. मात्र फेंगही यांना तेवढे महत्त्व दिले गेले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या -

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

अमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...!

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

कोरोनामुळे अनेकांच्या 'अंतिम' इच्छेला मूठमाती; अवयवदानाचा/देहदानाचा टक्का घसरला

टॅग्स :russiaरशियाIndiaभारतchinaचीनVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी