"मोदी मित्रच नाही तर भाऊ!"; इस्रायलच्या संसदेत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे भावनिक उद्गार, म्हणाले, "भारत आमचा...!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 22:24 IST2026-02-25T22:23:25+5:302026-02-25T22:24:30+5:30

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोदींचा उल्लेख 'भाऊ' असा करत भारताला आपला महान मित्र म्हटले आहे.

pm modi is not just a friend, he is a brother Prime Minister Benjamin Netanyahu's emotional speech in the Israeli parliament | "मोदी मित्रच नाही तर भाऊ!"; इस्रायलच्या संसदेत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे भावनिक उद्गार, म्हणाले, "भारत आमचा...!"

"मोदी मित्रच नाही तर भाऊ!"; इस्रायलच्या संसदेत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे भावनिक उद्गार, म्हणाले, "भारत आमचा...!"


पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. विमानतळावरील भव्य-दिव्य स्वागतानंतर त्यांनी इस्रायलच्या संसदेला (क्नेसेट) संबोधित केले. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोदींचा उल्लेख 'भाऊ' असा करत भारताला आपला महान मित्र म्हटले आहे.

नेतन्याहू यांचे भावनिक भाषण -
संसदेत बोलताना नेतन्याहू म्हणाले, "नरेंद्र मोदी, माझे प्रिय मित्र, हे केवळ शब्द नाहीत. मी तर म्हणेन की, ते मित्रापेक्षा अधिक माझे भाऊ आहेत. अनेक अर्थांने आपण भाऊ आहोत." यापूर्वीच्या भेटीची आठवण करून देताना ते म्हणाले, "जेव्हा गेल्या वेळी आपण येथे आला होतात, तेव्हा आपण दोघेही भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर होतो आणि मी म्हणालो होतो, आपण आपले बूट काढून पाण्यात का चालत नाही? आम्हाला ते शुद्ध करायचे होते आणि आम्ही ते इस्रायली तंत्रज्ञानाच्या मदतीने केले."

"तुमच्या भेटीने मी कधीही झालो नाही, तेवढा प्रभावित झालो आहे" -
पंतप्रधान मोदींसोबत संसदेत बोलताना नेतन्याहू म्हणाले, "मला कुटनीतीक व्हावे लागेल; मी याला एखाद्या कॅटेगिरीत ठेवणार नाही." मला संकटात पडायचे नाही, मात्र, तुमच्या भेटीने मी कधीही झालो नाही, तेवढा प्रभावित झालो आहे. आज, आपल्यासोबत इस्रायलचा एक महान मित्र, भारत-इस्रायल युतीचा एक महान समर्थक आणि जागतिक स्तरावरील एक महान नेता आहे. माझे प्रिय मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेरुसलेममध्ये आपले स्वागत आहे.

दोन्ही देशांच्या इतिहासाचा उल्लेख करत नेतन्याहू म्हणाले, "आपण दोघेही सुमारे ८० वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीतून एकाच वेळी मुक्त झालो. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि इस्रायलनेही अनेक संकटांचा सामना करत, आपली लोकशाही टिकवून ठेवली आहे. आपले हितसंबंध आणि आव्हाने सारखीच आहेत. 

Web Title : मोदी सिर्फ दोस्त नहीं, भाई हैं: नेतन्याहू के भावुक उद्गार।

Web Summary : मोदी की इस्राइल यात्रा के दौरान, नेतन्याहू ने उन्हें 'भाई' कहा, भारत के महत्व पर जोर दिया। उन्होंने साझा इतिहास, लोकतांत्रिक मूल्यों और आपसी हितों की प्रशंसा की, भारत-इस्राइल गठबंधन को उजागर किया।

Web Title : Modi is not just a friend, but a brother: Netanyahu's emotional words.

Web Summary : During Modi's Israel visit, Netanyahu called him 'brother,' emphasizing India's importance. He lauded their shared history, democratic values, and mutual interests, highlighting the strong India-Israel alliance.