शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
3
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
4
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
5
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
6
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
8
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
9
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
11
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
12
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
13
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
14
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
15
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
16
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
17
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
18
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
19
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

लॅण्डिंग करताना विमान थेट नदीत गेले, अमेरिकेतील चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:27 AM

क्युबा येथून उत्तर फ्लोरिडासाठी उड्डाण केलेले विमान जॅक्सनविले या एअर स्टेशनवर उतरत असताना अपघातग्रस्त झाले.

फ्लोरिडा : क्युबा येथून उत्तर फ्लोरिडासाठी उड्डाण केलेले विमान जॅक्सनविले या एअर स्टेशनवर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. हे विमान धावपट्टी संपल्यानंतर विमान कमी पाणी असलेल्या नदीत जाऊन पडले. १४३ प्रवासी असलेल्या या विमानातील एकाही प्रवाशाला काहीही दुखापत झाली नाही.क्युबाच्या नौसेनेच्या ग्वांतानामो बे या विमानतळावरून १३६ प्रवासी आणि चालकांसह ७ कर्मचाऱ्यांंना घेऊन बोईंग ७३७ विमान फ्लोरिडा येथील नेव्हल एअर स्टेशन जॅक्सनविले येथे उतरणार होते. त्यावेळी विमान धावपट्टीवरून घसरून सेंट जॉन्स या नदीत पडले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. २१ प्रवाशांना किरकोळ तपासण्यासांठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. समुद्री विभागाचे पथक दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी गेले. तसेच अग्निशमन आणि मदत कार्य विभागाचे ९० कर्मचारीही तातडीने घटनास्थळी पोहचले.शुक्रवारी रात्री झालेल्या दुर्घटनेबद्दल नेव्हल एअर स्टेशन जॅक्सनविले यांच्यातर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. जॅक्सनविले शेरिफ कार्यालयाने ‘व्टिटर’वर मदत कार्याची माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी पोस्ट केलेल्या छायाचित्रामध्ये विमानावर मियामी एअर इंटरनॅशनलचा लोगो दिसत आहे. विमान धावपट्टीच्या बाहेर कसे गेले, याचे कारण अद्याप समजलेले नाही. (वृत्तसंस्था)इंधनाचा प्रवाह थांबवलाच्कॉनर म्हणाले, सगळे जण बचावले आहेत. मला वाटते, हा एक चमत्कारच आहे. विमान नदीतून बाहेर काढण्यास किती वेळ लागेल, याविषयी सांगता येणार नाही. मात्र, विमान नदीच्या तळाशी स्थिर दिसत आहे. तेथून ते दूर जाण्याची शक्यता कमी आहे. विमान नदीत पडल्यानंतर चालकांच्या गटाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी इंधनाचा प्रवाह थांबविण्याचे काम सुरु केले.

टॅग्स :Accidentअपघात