मधुमेह, लठ्ठपणा अन् हृदयरोग असेल तर मिळणार नाही अमेरिकेचा व्हिसा, स्थलांतरण रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 07:49 IST2025-11-09T07:49:25+5:302025-11-09T07:49:48+5:30
United State News: अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी किंवा अमेरिकेत ग्रीन कार्ड असलेल्यांना ट्रम्प प्रशासनाच्या नव्या व्हिसा नियमांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मधुमेह, लठ्ठपणा अन् हृदयरोग असेल तर मिळणार नाही अमेरिकेचा व्हिसा, स्थलांतरण रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा आदेश
वॉशिंग्टन - अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी किंवा अमेरिकेत ग्रीन कार्ड असलेल्यांना ट्रम्प प्रशासनाच्या नव्या व्हिसा नियमांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ज्या परदेशी नागरिकांना किंवा अमेरिकेत राहणाऱ्या ग्रीनकार्डधारकांना मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोगसारखे अन्य गंभीर आजार आहेत, ते अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास अपात्र ठरतील, असे निर्देश अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने आपले दूतावास व कॉन्सुलर अधिकाऱ्यांना दिले आहेत. आजाराग्रस्त परदेशी नागरिकांच्या उपचाराचा खर्च अमेरिकेच्या तिजोरीवर पडू नये व अन्य संसाधनांवर त्यांच्यावर भार पडू नये, म्हणून हे निर्देश आहेत.