शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Kashmir Issue : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला युरोपियन युनियनचा झटका, भारताला 'फुल्ल सपोर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 2:29 PM

Kashmir Issue : काश्मीर प्रश्नावरूनभारताविरोधात जगभरात अपप्रचार करण्यात गुंतलेल्या पाकिस्तानला युरोपियन युनियनने जबरदस्त धक्का दिला आहे.

ब्रुसेल्स - काश्मीर प्रश्नावरूनभारताविरोधात जगभरात अपप्रचार करण्यात गुंतलेल्या पाकिस्तानला युरोपियन युनियनने जबरदस्त धक्का दिला आहे. दहशतवादाच्या मुद्यावरून  युरोपियन संसदेतील अनेक देशांच्या नेत्यांनी पाकिस्तानची एका सुरात जळजळीत टीका केली आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण मिळते, तसेच हे दहशतवादी भारतात हल्ले करतात, त्यामुळे आपण भारताला समर्थन दिले पाहिजे, असे युरोपियन युनियनच्या नेत्यांनी सांगितले. भारत सरकारने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर हा प्रश्न वारंवार उपस्थित करत आहे. मात्र पाकिस्तानचा भारतविरोधी डाव फोल ठरत आहे. आता तर युरोपियन युनियनने दहशतवादाच्या मुद्द्यावरून  पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पितळ उघडे पाडले आहे. 

युरोपियन युनियनमधील चर्चेत पोलंडचे नेते आणि युरोपियन युनियनमधील प्रतिनिधी रिजार्ड जार्नेकी म्हणाले की, ''भारत जगातील सर्वात महान लोकशाही देश आहे. या देशातील जम्मू काश्मीर या राज्यात होत असलेल्या दहशतवादी कारवायांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. हे दहशतवादी चंद्रावरून येत नाहीत. तर पाकिस्तानमधून पाठवले जातात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण भारताला पाठिंबा दिला पाहिजे.''

 तर इटलीचे नेते आणि युरोपियन युनियनमधील प्रतिनिधी फुलवियो मार्तुसिलो म्हणाले की, पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करण्याची धमकी देत आहे. पाकिस्तान हा तोच देश आहे जिथे दहशतवादी कट रचून युरोपमध्ये हल्ले घडवून आणतात.'' काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानने चर्चा केली पाहिजे. तसेच या प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढला पाहिजे, असेही त्यांनी पुढे नमूद केले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवादArticle 370कलम 370