तणाव वाढला! ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कंधारमध्ये एअर स्ट्राईक; लष्करी तळांना केलं टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 10:12 IST2026-03-15T10:11:49+5:302026-03-15T10:12:28+5:30

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कंधार भागात तालिबानशी संबंधित लष्करी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे.

pakistan strike taliban bases afghanistan pak afghan war | तणाव वाढला! ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कंधारमध्ये एअर स्ट्राईक; लष्करी तळांना केलं टार्गेट

तणाव वाढला! ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कंधारमध्ये एअर स्ट्राईक; लष्करी तळांना केलं टार्गेट

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पाकिस्ताननेअफगाणिस्तानच्या कंधार भागात तालिबानशी संबंधित लष्करी तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. आपल्या शहरांवर अलीकडेच झालेल्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या विविध शहरांवर अनेक ड्रोन घिरट्या घालताना दिसले होते. सुरक्षा यंत्रणांनी हे ड्रोन वेळीच रोखल्यामुळे ते आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र काही ठिकाणी मोठं नुकसान झालं. क्वेटा येथे दोन मुलं जखमी झाली, तर कोहाट आणि रावलपिंडीमध्येही काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ड्रोनच्या हालचाली लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून इस्लामाबादच्या आसपासची हवाई हद्द काही काळासाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर, नागरी वस्त्या आणि लष्करी तळांना टार्गेट करणे म्हणजे "रेड लाईन ओलांडण्यासारखे" आहे, असं पाकिस्तानने म्हटलं. या ड्रोन हल्ल्यांचा कट अफगाणिस्तानमधील कंधारमधील तळांवरून रचला गेल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

 

संघर्ष शिगेला! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ड्रोन अटॅक; तालिबानकडून एअर स्ट्राईकवर पलटवार

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनेही पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी पाकिस्तानने राजधानी काबुल आणि पूर्व अफगाणिस्तानच्या काही भागात एअर स्ट्राईक केला, ज्यामध्ये किमान सहा नागरिकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १५ जण जखमी झाले, असा दावा काबुलने केला आहे.

अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी असाही आरोप केला की, पाकिस्तानी विमानांनी कंधार विमानतळाजवळील 'काम एअर' (Kam Air) या खासगी विमान कंपनीच्या इंधन डेपोला टार्गेट केले. हे इंधन नागरी आणि संयुक्त राष्ट्रांच्या (UN) विमानांसाठी वापरलं जातं.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; महिलांसह मुलांना केलं टार्गेट, ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी

नागरिकांना टार्गेट केल्याचे आरोप पाकिस्तानने फेटाळून लावले आहेत. आपली कारवाई केवळ 'पाकिस्तानी तालिबान' (TTP) आणि त्यांच्या नेटवर्क विरुद्ध असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. याच दरम्यान, पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील लक्की मरवत जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात सात पाकिस्तानी पोलिसांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला आहे.

Web Title : ड्रोन हमलों के बाद पाकिस्तान ने अफ़गान तालिबान पर हमला किया, तनाव बढ़ा।

Web Summary : पाकिस्तान ने अपने शहरों पर ड्रोन हमलों के बाद अफ़गानिस्तान में तालिबान से जुड़े ठिकानों पर हवाई हमले किए। अफ़गानिस्तान ने पाकिस्तानी हमलों से नागरिकों के हताहत होने का आरोप लगाया है, जिसका पाकिस्तान ने खंडन करते हुए कहा कि उसके निशाने केवल टीटीपी से जुड़े हैं। सड़क किनारे बम विस्फोट में पाकिस्तानी पुलिस की मौत के बाद तनाव और बढ़ गया है।

Web Title : Tensions soar as Pakistan strikes Afghan Taliban targets after drone attacks.

Web Summary : Pakistan conducted airstrikes on Taliban-linked targets in Afghanistan following drone attacks on its cities. Afghanistan alleges civilian casualties from Pakistani strikes, a claim Pakistan denies, stating its targets are solely TTP related. Tensions remain high after a roadside bomb killed Pakistani police.