संघर्ष शिगेला! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ड्रोन अटॅक; तालिबानकडून एअर स्ट्राईकवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:07 IST2026-03-13T12:06:37+5:302026-03-13T12:07:30+5:30

पाकिस्तानने गुरुवारी मध्यरात्री अफगाणिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकना प्रत्युत्तर म्हणून तालिबान आणि 'अफगाण डिफेन्स फोर्सेस'ने मोठ्या प्रमाणावर काऊंटर अटॅक सुरू केले आहेत.

taliban launches drone counter attack against pakistan cities conflict | संघर्ष शिगेला! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ड्रोन अटॅक; तालिबानकडून एअर स्ट्राईकवर पलटवार

संघर्ष शिगेला! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर ड्रोन अटॅक; तालिबानकडून एअर स्ट्राईकवर पलटवार

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता पूर्णतः लष्करी संघर्षाच्या दिशेने वळताना दिसत आहे. पाकिस्तानने गुरुवारी मध्यरात्री अफगाणिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकना प्रत्युत्तर म्हणून तालिबान आणि 'अफगाण डिफेन्स फोर्सेस'ने मोठ्या प्रमाणावर काऊंटर अटॅक सुरू केले आहेत. लेटेस्ट रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या अनेक शहरांना टार्गेट करत ड्रोन हल्ले केले आहेत.

पाकिस्तानने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अफगाणिस्तानच्या विविध शहरांवर भीषण एअर स्ट्राईक केला होता, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांना टार्गेट करण्यात आलं होतं. तसेच सर्वसामान्यांची घरं मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत.

अफगाण तालिबानच्या सीमा सुरक्षा दलाचे प्रवक्ते अबिदुल्लाह उकाब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांनी पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तर हल्ले सुरू केले आहे. त्यांनी दावा केला आहे की, अफगाण तालिबानने पाकिस्तानच्या विविध शहरांमधील लष्करी केंद्रांना टार्गेट केलं आहे, ज्यामध्ये कोहाटचे सेंट्रल कमांड, कोहाट ब्रिगेड आणि लष्करी कॅम्पचा समावेश आहे. सध्या पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असून तेथील प्रशासन 'हाय अलर्ट'वर आहे.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; महिलांसह मुलांना केलं टार्गेट, ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी

अफगाण तालिबान डिफेन्स फोर्सेसने स्पष्ट केलं आहे की, हे ऑपरेशन अजून थांबलेलं नाही. तालिबानच्या एका प्रवक्त्याने म्हटलं आहे की, "आमच्या जमिनीवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचं उत्तर आता त्यांच्या भूमीवरच दिलं जाईल." सध्या सीमावर्ती भागांत दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार आणि लष्करी हालचाली खूप वाढल्या आहेत.

या संघर्षामुळे दक्षिण आशियात अस्थिरतेचं नवे पर्व सुरू झालं आहे. पाकिस्तान या हल्ल्यांना दहशतवादी तळांवरील कारवाई म्हणत आहे, तर अफगाणिस्तान याला आपल्या स्वातंत्र्यावर केलेला हल्ला मानून आक्रमक पवित्रा घेत आहे. तज्ज्ञांच्या मते जर तातडीने हे थांबलं नाही तर त्याचे नंतर गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागू शकतात. 

Web Title : पाकिस्तान पर अफ़ग़ानिस्तान का ड्रोन हमला; तनाव चरम पर!

Web Summary : पाकिस्तान के हवाई हमलों के जवाब में अफ़ग़ानिस्तान ने सैन्य ठिकानों को निशाना बनाते हुए जवाबी हमला किया। नागरिकों की हताहतों के बाद हमलों से तनाव बढ़ गया है। दोनों ओर से गोलीबारी जारी, क्षेत्रीय अस्थिरता की आशंका। तत्काल शांत होना ज़रूरी है।

Web Title : Afghanistan retaliates Pakistan's air strikes with drone attacks; tensions escalate.

Web Summary : Afghanistan struck back after Pakistan's air strikes, targeting military centers. The attacks, following civilian casualties, mark a dangerous escalation. Both sides exchange fire, raising regional instability concerns and fears of further conflict. Immediate de-escalation is crucial.