पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; महिलांसह मुलांना केलं टार्गेट, ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:34 IST2026-03-13T11:34:03+5:302026-03-13T11:34:39+5:30

पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या विविध शहरांवर  एअर स्ट्राईक केला आहे.

pakistan army air strike afghanistan kabul kandahar paktian many house destroyed affected women child | पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; महिलांसह मुलांना केलं टार्गेट, ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक; महिलांसह मुलांना केलं टार्गेट, ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी

इस्रायल-इराण संघर्ष सुरू असतानाच आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष देखील टोकाला गेला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या विविध शहरांवर  एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांना टार्गेट करण्यात आलं असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुल, कंदहार, पकटिया आणि पक्तिका यांना टार्गेट केलं. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी निवासी वस्त्यांवर बॉम्बफेक करण्यात आली असून यात सर्वसामान्यांची घरं मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. काही हल्ले मैदानांवर किंवा वाळवंटी भागातही झाले आहेत.

इंधन डेपोवर हल्ला

या लष्करी कारवाईत कंदहार विमानतळाजवळ असलेल्या 'काम एअर' (Kam Air) कंपनीच्या इंधन डेपोलाही टार्गेट करण्यात आलं. ही कंपनी नागरी विमानांसह संयुक्त राष्ट्रांच्या (UN) विमानांना देखील इंधन पुरवठा करते. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून मानवी हक्कांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

'ऑपरेशन गजब-लिल-हक'

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून अधिक वाढला आहे. दहशतवादी हल्ले रोखण्यात तालिबान अपयशी ठरल्याचा आरोप करत पाकिस्तानने गेल्या आठवड्यात बगराम विमानतळावरही हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सीमेवरील ५३ ठिकाणांना टार्गेट केलं होत. याला उत्तर देण्यासाठीच पाकिस्तानने २६ फेब्रुवारीपासून 'ऑपरेशन गजब-लिल-हक' ही लष्करी मोहीम सुरू केली आहे.

Web Title : पाकिस्तान का अफगानिस्तान पर हवाई हमला; महिलाओं, बच्चों को निशाना बनाया, हताहत

Web Summary : पाकिस्तान ने अफगानिस्तान के काबुल, कंधार और अन्य क्षेत्रों पर हवाई हमले किए। नागरिक क्षेत्रों को निशाना बनाया गया, जिसमें महिलाओं और बच्चों की मौतें हुईं। कंधार हवाई अड्डे के पास ईंधन डिपो को भी निशाना बनाया गया। सीमा पार हमलों और 'गजब-लिल-हक' ऑपरेशन के बाद तनाव बढ़ा।

Web Title : Pakistan Air Strikes Afghanistan, Targeting Women and Children; Casualties Reported

Web Summary : Pakistan launched air strikes in Afghanistan, targeting Kabul, Kandahar, and other regions. Civilian areas were hit, resulting in deaths of women and children. Fuel depot near Kandahar airport was also targeted. Tensions escalate following cross-border attacks and Operation 'Gajab-Lil-Haq'.