शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधवबाबत पाकिस्तान मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:35 IST

Kulbhushan Jadhav : पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्याची तयारी पाकिस्तानने केली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्याची तयारी पाकिस्तानने केली आहे. कुलभूषण जाधव यांच्याविरोधात सुरू असलेला खटला लष्करी न्यायालयाऐवजी नागरी न्यायालयात चालवण्यासाठी आर्मी अॅक्टमध्ये बदल करण्याची तयारी पाकिस्तानने सुरू केली आहे. त्यानंतर जाधव यांना त्यांना झालेल्या अटकेविरोधात नागरी न्यायालयात दाद मागावी लागेल.  दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला फटकारले होते. कुलभूषण जाधव यांना देण्यात आलेल्या वागणुकीवरून पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती अब्दुलकावी वुसुफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत हे सांगितले होते. कुलभूषण प्रकरणात 17 जुलैला जारी करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत ते म्हणाले की,   पाकिस्तान कुलभूषण प्रकरणात व्हिएन्ना करारांतर्गत येणाऱ्या कलम 36चं उल्लंघन केले आहे. या प्रकरणात त्यांनी योग्य पावले उचलली नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.193 देशांची सदस्यसंख्या असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युसूफ म्हणाले, व्हिएन्ना करारानुसार कायदेशीर मदत देणं बंधनकारक आहे, पण पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना तशी मदत दिलेली नाही. पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून अटक केली होती. परंतु व्हिएन्ना करारात हेरगिरीसाठी वेगळ्या अशा कोणत्याही तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे पाकिस्ताननं मदत देणं आवश्यक होतं.  भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेले कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली होती. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानCourtन्यायालयIndiaभारत