शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी परदेशातून मिळालेले गिफ्ट विकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 14:24 IST

Imran Khan: पाकिस्तानातील आर्थिक संकट आणि महागाईवरुन इम्रान खान सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आता इम्रान खान यांना परदेशातून मिळालेल्या गिफ्ट्सच्या बाबतीत वाद निर्माण झाला आहे.

Imran Khan: पाकिस्तानातील आर्थिक संकट आणि महागाईवरुन इम्रान खान सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आता इम्रान खान यांना परदेशातून मिळालेल्या गिफ्ट्सच्या बाबतीत वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांनी इम्रान खान यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. इम्रान खान यांनी इतर देशांकडून मिळालेले गिफ्ट्स विकून टाकले आहेत, असा ट्विट मरियम यांनी केलं आहे. 

पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी उर्दूत एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. "इम्रान खान यांनी परदेशातून मिळालेले गिफ्ट्स विकून टाकले आहेत. एका बाजूला खलीफा हजरत उमर (पैगंबर मोहम्मद यांचे साथीदार) आपल्या कमीजचा देखील हिशोब द्यायचे आणि एका बाजुला तुम्ही (इम्रान खान) देशाच्या तिजोरीतून सर्व गिफ्ट्स विकून टाकत आहेत. तुम्ही कशाच्या जोरावर मदीनेसारखा देश निर्मितीची भाषा करता? एखादा व्यक्ती इतका असंवेदनशील, बहिरा, मुका आणि आंधळा कसा असू शकतो?", अशा आशयाचं ट्विट मरियम यांनी केलं आहे. 

पीडीएमनंही साधला इम्रान खान यांच्यावर निशाणाविरोधी पक्षाच्या भूमिकेतील पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचे (PDM) प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनीही पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. "पंतप्रधान इम्रान खान यांनी एका प्रिन्सकडून मिळालेलं महागडं घड्याळ विकल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर याबाबतच्या बातम्या येत आहेत. यात आखाती देशातील एका राजकुमारानं खान यांना १० लाख डॉलर्सचं महागडं घड्याळ गिफ्ट दिलं होतं. इम्रान खान यांनी दुबईतील त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीला ते घड्याळ १० लाख डॉलरला विकल्याचं सांगितलं जात आहे. जर हे खरं असेल तर ही अतिशय शरमेची बाब आहे", असं मौलाना फजलुर रहमान म्हणाले. 

पाकिस्तानच्या गिफ्ट डिपॉझिटरी नियमांनुसार देशाच्या सर्वोच्च नेत्याला मिळणारे गिफ्ट्स देशाची संपत्ती मानले जातात. यासोबतच त्यांचा लिलाव करण्याचीही परवानगी नाही. पाक नियमानुसार कोणताही अधिकारी त्याला मिळालेल्या गिफ्टपैकी १० हजाराखालील किमतीची वस्तू स्वत:सोबत ठेवू शकतो. पण त्यापेक्षी अधिक किमतीची गिफ्ट्स सरकारी तिजोरीत जमा केले जातात. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान