शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 22:05 IST

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरले आहे. अशातच, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. 'भारत कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत,' अशी प्रतिक्रिया पाक संरक्षणमंत्र्याने दिली.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ख्वाजा आसिफ म्हणाले, 'पाकिस्तानी लष्कराने भारताच्या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल सरकारला माहिती दिली आहे. आम्ही आमचे सैन्यही बळकत केले असून, पूर्ण पाकिस्तान अलर्ट मोडवर आहे. आमच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण झाला, तर आम्ही आमच्या अण्वस्त्रांचा वापर करू.' 

पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रियापहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देश दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेत पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारला आणि पहलगाममधील 26 जणांच्या हत्येची कोणतीही निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यास ते तयार असल्याचे म्हटले.

भारताची पाकवर कारवाईपहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली आहेत. भारताने उचललेल्या पावलांमध्ये 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित करणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करणे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत