शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 17:53 IST

यामुळे इराण अन्न-धान्यासाठीही असहाय्य होऊ शकतो...

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे, आता इस्त्रायल काय करणार? इराणच्या हल्ल्याला तो कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार? यातच आता, इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोठे संकेत दिले आहेत. इस्त्रायल इराणच्या कृत्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बदल्याचा प्लॅनही तयार केला आहे. इराणच्या कण्यावरच घाव घालण्याची तयारी सुरू आहे. त्यांच्या स्ट्रॅटेजिक ठिकाणांना निशाना बनवले जाईल. ज्या तेलाच्या बळावर इराणच्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण मादार आहे, तीच नष्ट करण्याची योजना आहे. यामुळे इराण अन्न-धान्यासाठीही असहाय्य होऊ शकतो.

इस्त्रायली अधिकारी एक्सिओससोबत बोलताना म्हणाले, "आम्ही पूर्णपणे तयार आहोत. सरकारकडून आदेश मिळताच क्षणात हल्ला केला जाईल. सर्वप्रथम इराणच्या ऑइल फॅसिलिटीला लक्ष्य केले जाईल. तेल विहिरी आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ला केला जाईल. हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली जाईल. त्यांच्या सैन्याला ज्या ठिकाणाहून शस्त्रे मिळतात ती ठिकाणेही नष्ट केली जातील. काही बड्या नेत्यांनाही टार्गेट केले जाईल. इराण अनेक वर्षांपासून अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्न करत आहे. तेही नष्ट करण्याचा प्लॅन इस्रायल आखत आहे. महत्वाचे म्हणजे इस्रायलने यापूर्वीही इराणचे अनेक सायंटिस्ट मारले आहेत.

केवळ आदेशाची प्रतीक्षा -सरकारकडून आदेश मिळाल्यास आम्ही त्यांच्या अणु केंद्रांवर हल्ला करू, असे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, असा हल्ला होईल, ज्याची इराणने कधी कल्पनाही केली नसेल. लढाऊ विमाने इराणमध्ये शिरून बॉम्बिंग करतील. इस्रायलने  एप्रिलमहिन्यात इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला होता. तेव्हा इस्रायलने कोणतीही मोठी कारवाई केली नाही. मात्र आता जो हल्ला होईल तो अत्यंत भयावह असेल, असा दावाही इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्ध