शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वेतनात तब्बल 66 टक्क्यांची वाढ; सत्या नाडेलांचा पगार पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 22:27 IST

मायक्रोसॉफ्टकडून नाडेलांच्या पगारात घसघशीत वाढ

वॉशिंग्टन: आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेलांच्या वेतनात तब्बल 66 टक्क्यांची वाढ झाली आहे. नडेला यांना 2019 मध्ये 300 कोटी रुपये वेतन मिळालं आहे. यामध्ये बहुतांश वेतन कंपनीच्या समभागांच्या स्वरुपात आहे. मायक्रोसॉफ्टनं प्रसिद्ध केलेल्या वार्षिक परिपत्रकातून नाडेलांच्या वेतनाबद्दलची माहिती समोर आली. सत्या नाडेला यांच्या नेतृत्त्वाखाली मायक्रोसॉफ्टनं अपेक्षित उद्दिष्ट गाठली. याशिवाय कंपनीच्या समभागांच्या दरांमध्येदेखील मोठी वाढ झाली. त्याचं बक्षीस म्हणून नाडेलांच्या वेतनात तब्बल 66 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. नाडेला यांना वेतनातील बराचसा भाग समभागांच्या स्वरुपात मिळतो. नाडेला यांचं एकूण वेतन 4.29 कोटी डॉलर आहे. त्यापैकी 2.96 कोटी डॉलर त्यांना समभागांच्या रुपात मिळतात. तर 1.07 कोटी डॉलर इतकी रक्कम प्रोत्साहन योजनेतून मिळते. या व्यतिरिक्त 1,11,000 डॉलर त्यांना अन्य गोष्टींमधून मिळतात.1967 मध्ये हैदराबाद इथं जन्मलेल्या सत्या नाडेलांनी 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली. स्टिव्ह बाल्मर यांच्याकडून त्यांनी कंपनीची सूत्रं हाती घेतली. 2017-18 मध्ये त्यांना 2.58 कोटी डॉलर इतकं वेतन मिळालं होतं. नाडेलांच्या नेतृत्त्वाखाली मायक्रोसॉफ्टनं अनेक क्षेत्रांमध्ये दमदार वाटचाल केली आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट घेतलेली भरारी हे नाडेला यांचं मोठं यश मानलं जातं.