शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Mark Zuckerberg : मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेवर १७२ कोटींचा झाला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 06:02 IST

Mark Zuckerberg : फेसबुक कंपनीच्या सुरक्षेचा वार्षिक आढावा घेण्यात आला. मार्क झुकरबर्ग यांना ‘नेमक्या धमक्या’ असल्याचे स्पष्टीकरण निवेदनात करण्यात आले आहे.

वॉशिंग्टन : फेसबुक या समाज माध्यमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेसाठी २०२० मध्ये २३ दशलक्ष डॉलर्सपेक्षाही (साधारण १७२ कोटी रुपये) जास्त खर्च झाला. ही माहिती सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे फेसबुकने सादर केलेल्या दस्तावेजात दिली गेली आहे.फेसबुक कंपनीच्या सुरक्षेचा वार्षिक आढावा घेण्यात आला. मार्क झुकरबर्ग यांना ‘नेमक्या धमक्या’ असल्याचे स्पष्टीकरण निवेदनात करण्यात आले आहे. फेसबुक आणि झुकरबर्ग हे समानार्थी शब्द असल्यामुळे आमच्या कंपनीबद्दल नकारात्मक भावना ही थेटपणे झुकरबर्ग यांच्याशी संबंधित असते व ती त्यांच्याकडेच जाते. मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणाचा खर्च हा २०२० मध्ये खूपच वाढला. कारण, कोविड-१९ प्रवासाची आचारसंहिता, २०२० मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत सुरक्षेवर झालेला वाढीव खर्च, सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील वाढलेला खर्च आणि इतर वेळी सुरक्षेबाबतची जोखीम फेसबुकच्या वार्षिक सुरक्षा आढाव्यात स्पष्ट झाली. 

२३ दशलक्ष डॉलर्स झुकेरबर्ग यांची त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा, कुटुंबाचा प्रवास यावर खर्च झाले.

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गAmericaअमेरिकाFacebookफेसबुक