Latest Marathi News LIVE: सेमीफायनलमध्ये भारताने टॉस हरला, प्रथम फलंदाजी करणार, संघात बदल नाही!

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:59 IST2026-03-05T09:09:05+5:302026-03-05T19:59:07+5:30

Todays Breaking US-Israel Iran War Live News Updates in Marathi: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धावर तातडीने तोडगा ...

Maharashtra Marathi News US-Israel Iran war live updates 5 March 2026: PM Narendra Modi, Gulf countries, Donald Trump, Benjamin Netanyahu, Maharashtra assembly Budget Session, Devendra Fadnavis, T20 World Cup, Rajya Sabha Election | Latest Marathi News LIVE: सेमीफायनलमध्ये भारताने टॉस हरला, प्रथम फलंदाजी करणार, संघात बदल नाही!

Latest Marathi News LIVE: सेमीफायनलमध्ये भारताने टॉस हरला, प्रथम फलंदाजी करणार, संघात बदल नाही!

Todays Breaking US-Israel Iran War Live News Updates in Marathi: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धावर तातडीने तोडगा निघण्याची फारशी चिन्हं नाहीत. उलट, डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांचे इशारे आणि त्याला इराणकडून मिळणारे प्रतिइशारे यामुळे हा संघर्ष अधिक चिघळू शकतो. यामुळे आखाती देशातील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न देशात चर्चेत आहे. तसंच, कच्च्या तेलाचे नियोजन करण्याचे आणि महागाई रोखण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. त्याशिवाय राज्यसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी तयारी केली आहे. महाराष्ट्रातील सात जागा बिनविरोध निवडल्या जाणार आहेत. मविआने अखेर शरद पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प उद्या जाहीर होणार असून त्याबद्दल उत्सुकता आहे. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत आज टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली आहे.

LIVE

Get Latest Updates

05 Mar, 26 : 07:58 PM

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी दिला राजीनामा

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांच्या ओएसडीने सांगितले की आनंद यांनी आपला राजीनामा भारताच्या राष्ट्रपतींकडे पाठवला आहे.

05 Mar, 26 : 06:40 PM

सेमीफायनलमध्ये भारताने टॉस हरला, प्रथम फलंदाजी करणार

सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक गमावली. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. भारताच्या संघात कोणताही बदल नाही. इंग्लंडने जेमी ओव्हरटर्नला संघात घेतले आहे.

05 Mar, 26 : 05:57 PM

इराणने पाकिस्तानला दिली होती डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची सुपारी? न्यायालयात धक्कादायक खुलासा

न्यू यॉर्क न्यायालयातील एका खटल्यादरम्यान खळबळजनक खुलासा झाला. पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट (वय, ४७) याने न्यायाधीशांसमोर धक्कादायक विधान केले की, इराणी गुप्तचर अधिकाऱ्याने त्याला अमेरिकेतील प्रमुख राजकारण्यांच्या हत्येच्या कटात भाग पाडले होते.
 

05 Mar, 26 : 04:55 PM

नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद! अर्जुन तेंडुलकर-सानिया चांडोकच्या लग्नाला शिंदे-फडणवीसांची हजेरी

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक आज लग्नबंधनात अडकले. या नवदाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभाशीर्वाद दिले.

Image

05 Mar, 26 : 01:47 PM

VSR कंपनीचे मालक सीआयडी कार्यालयात दाखल

अजित पवार विमान अपघात प्रकरणी VSR कंपनीचे मालक व्हि.के सिंग सीआयडी कार्यालयात पोहचले आहे. सिंग यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप सातत्याने रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे. या विमान अपघाताची चौकशी सीआयडीकडून सुरू आहे. 

05 Mar, 26 : 12:47 PM

ठाण्यात ई-चलनच्या जाचाविरोधात ठाण्यात वाहतूकदारांचे आंदोलन

ई-चलनच्या जाचाविरोधात ठाण्यात वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. बस ओनर्स सेवा संघ आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ऍक्शन कमिटीच्या वतीने ठाण्यात आंदोलन छेडण्यात आले आहे. ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात वाहतूकदारांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी काळे झेंडे हातात घेत रस्त्यावर उतरून ई-चलन प्रणालीचा निषेध व्यक्त केला. मोठ्या संख्येने वाहतूकदार मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखत वाहने यू-टर्न करून पुन्हा ठाण्याच्या दिशेने वळवली.

05 Mar, 26 : 12:33 PM

VSR कंपनीचे मालक सीआयडी कार्यालयात दाखल

अजित पवार विमान अपघात प्रकरणी VSR कंपनीचे मालक व्हि.के सिंग सीआयडी कार्यालयात पोहचले आहे. सिंग यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप सातत्याने रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे. या विमान अपघाताची चौकशी सीआयडीकडून सुरू आहे. 

05 Mar, 26 : 12:26 PM

तेहरानमधून आली आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी!

मध्यपूर्वेतील रणसंग्राम आता एका अशा वळणावर पोहोचला आहे, जिथून संपूर्ण जगाचा विनाश होऊ शकतो. इराणमध्ये सत्तापालट करण्याचे प्रयत्न अमेरिका आणि इस्रायलने केल्यास, इस्रायलचे सर्वात मोठे अण्वस्त्र केंद्र उडवून देण्याची उघड धमकी इराणने दिली आहे. "आमच्या देशाच्या अंतर्गत विषयात ढवळाढवळ केली किंवा शासन बदलण्याचा प्रयत्न केला, तर इस्रायलला अण्वस्त्रांच्या ढिगाऱ्यावर बसवू," अशा शब्दात तेहरानने जगाला इशारा दिला आहे.

05 Mar, 26 : 12:25 PM

नाशिक: टिमक्या वाजवत काँग्रेसचे येवला तहसीलवर आंदोलन

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर टिमक्या वाजवत प्रतीकात्मक धरणे आंदोलन करण्यात आले. कांद्याला प्रति क्विंटल ३,००० रुपये हमीभाव जाहीर करावा, आधीच विक्री झालेल्या कांद्यास प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान द्यावे, तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत कपात करावी, अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात टिमक्या वाजवत धरणे आंदोलन केले.

05 Mar, 26 : 11:57 AM

इराणचे महाविनाशक बॉम्बर्स कतारने पाडले

मध्यपूर्वेतील युद्ध आता क्षेपणास्त्रांच्या पलीकडे जाऊन भीषण हवाई युद्धाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन एअरबेसवर हल्ला करण्यासाठी निघालेली इराणची दोन 'Su-24' टॅक्टिकल बॉम्बर्स विमाने कतारच्या हवाई दलाने चित्तथरारक पाठलाग करून पाडली आहेत. जर ही विमाने आणखी दोन मिनिटे हवेत राहिली असती, तर १० हजार अमेरिकन सैनिकांचा जीव गेला असता आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गॅस फॅसिलिटीचे प्रचंड नुकसान झाले असते.

05 Mar, 26 : 11:28 AM

इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हवाई हल्ला

मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर सर्वात मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. इस्रायलने १०० हून अधिक लढाऊ विमानांनी इराणची राजधानी तेहरानसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या मोठ्या लष्करी कारवाईमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले असून, इराण या हल्ल्याला काय प्रत्युत्तर देणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

05 Mar, 26 : 10:47 AM

आज बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ

सोने-चांदीच्या किमतींसोबतच क्रिप्टो मार्केटमध्येही तेजी असण्याचं चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. कमोडिटी मार्केटमध्ये तेजी परतली असली तरी, सोने आणि चांदीचे दर अजूनही त्यांच्या 'ऑल टाइम हाय'पेक्षा बरेच खाली आहेत. विशेषतः चांदीच्या किमतीत तर १,५०,००० रुपयांहून अधिकचा फरक आहे. हीच स्थिती आंतरराष्ट्रीय वायदा बाजारातही दिसून येत आहे.

 

05 Mar, 26 : 10:24 AM

तुमच्या शहरात आज इंधन स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या ताज्या किमती

इंधन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करत असतात, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होतो. सकाळी ६ वाजता देशातील इंधन कंपन्यांनी नवीन दर जाहीर करतात, हे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलर-रुपयाच्या विनिमय दरातील बदलांवर आधारित असतात. 

05 Mar, 26 : 10:23 AM

इराणसोबत युद्धामुळे इस्रायलला मोठा फटका

इस्रायलच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले की, इराणसोबत सुरू असलेल्या हवाई युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला दर आठवड्याला २.९३ अब्ज डॉलरहून अधिक नुकसान होऊ शकते. भारतीय चलनात हा आकडा पाहिला तर तो २७ हजार कोटी इतका होतो. या युद्धामुळे इस्रायलला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जर पुढील काळात हे युद्ध थांबले नाही तर नुकसान आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. युद्धामुळे त्याचा फटका देशातील अन्य कामांवरही पडला आहे.

05 Mar, 26 : 10:16 AM

गीतकार आशिष शिंदे यांची स्कॉर्पिओ जाळली; दोन गाड्या जळून खाक”

 ‘पाखरा आझाद केल तुला’ या लोकप्रिय गाण्याचे गीतकार आशिष शिंदे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कशेळी परिसरात घडली असून यात दोन गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.

05 Mar, 26 : 10:16 AM

भारतीय बंदरांवरून हल्ले होत असल्याचा दावा धादांत खोटा

अमेरिकेचे माजी कर्नल डगलस मॅकग्रेगर यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, "अमेरिका इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय बंदरांचा वापर करत आहे," असा खळबळजनक दावा केला होता. मात्र, भारत सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत हा 'प्रोपोगंडा' असल्याचे स्पष्ट केले आहे.
 

05 Mar, 26 : 10:11 AM

ई-चलनविरोधात कळंबोलीत चक्का जाम ; मुंबई–पुणे महामार्गावर वाहतुकीचा कोलमडला वेग

ई-चलन प्रणालीतील कथित मनमानी कारवाईविरोधात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा संताप गुरुवारी कळंबोली येथे उफाळून आला. ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्स, खासगी वाहन आणि स्कूल बस चालक-मालकांनी पुणे–मुंबई महामार्गावर वाहने उभी करून चक्का जाम आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सुमारे दिड तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि कळंबोली सर्कलसह परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.
 

05 Mar, 26 : 10:02 AM

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घराबाहेर आंदोलन

कांदा, दूध दरवाढीसाठी छावा क्रांतीवीर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. दर वाढीबाबत निर्णय घेण्याची आंदोलकांची मागणी आहे.  

05 Mar, 26 : 09:49 AM

नेपाळ निवडणूक : नेपाळमध्ये सत्तापालट होणार?

नेपाळच्या २७५ जागांपैकी १६५ जागांवर थेट मतदान होत आहे, तर ११० जागा समानुपातिक पद्धतीने भरल्या जाणार आहेत. बालेन शाह आणि त्यांचा पक्ष आरएसपी सध्या प्रचंड चर्चेत आहे. जर बालेन झापा-५ मध्ये ओलींना पराभूत करण्यात यशस्वी झाले, तर तो नेपाळच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय भूकंप ठरेल. नेपाळमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. नेपाळच्या या हाय व्होल्टेज लढाईचे निकाल लवकरच स्पष्ट होतील.

(वाचा संपूर्ण बातमी)

05 Mar, 26 : 09:42 AM

इराणसाठी किती महत्त्वाची होती 'IRIS Dena'?

अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणचे सर्वात प्रगत आणि स्वदेशी बनावटीचे युद्धपोत 'IRIS Dena' याला क्षेपणास्त्र डागून समुद्रात बुडवले आहे. 'IRIS Dena' हे केवळ एक जहाज नव्हते, तर इराणच्या लष्करी ताकदीचे ते प्रतीक होते. मोज-क्लास श्रेणीतील हे फ्रिगेट इराणने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केले होते. यामध्ये पहिल्यांदाच 'व्हर्टिकल लॉन्च सिस्टम' बसवण्यात आली होती, जी कोणत्याही कोनातून क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम होती. यावर 'कादिर' अँटी-शिप क्रूझ मिसाइल आणि हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी 'सय्याद' मिसाइल तैनात होते. या जहाजावर 'Asr 3D' फेज्ड अ‍ॅरे रडार होते, जे शत्रूला शेकडो मैल दूर असतानाच टिपू शकत होते.

05 Mar, 26 : 09:40 AM

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतातील सीएनजी-पीएनजी पुरवठ्यावर मोठे संकट

इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कतारमधील जगातील सर्वांत मोठ्या ऊर्जा प्रकल्पातील उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे कतारकडून भारताला होणारा एलएनजी गॅसचा पुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर असून, देशातील औद्योगिक आणि शहरी गॅस वापरावर ४० टक्केपर्यंत कपात लादण्यात आली आहे.

(वाचा सविस्तर)

05 Mar, 26 : 09:38 AM

अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झालेली?

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना उलटल्यानंतर समोर आलेल्या प्राथमिक अहवालावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अहवालातील त्रुटींवरून थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर निशाणा साधला आहे. या अहवालात जाणीवपूर्वक मूलभूत चुका करण्यात आल्याचा दावा करत, डीजीसीए नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा जळजळीत सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. (सविस्तर वाचा)

05 Mar, 26 : 09:15 AM

अमेरिकेच्या पाणबुडीने खालूनच इराणी जहाजावर क्षेपणास्त्र डागले

अमेरिका आणि इराणमधील युद्ध आणखी वाढले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले वाढवले आहेत. दरम्यान, काल अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणच्या युद्ध नौकेवर मोठा हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. एका अमेरिकन पाणबुडीने हिंदी महासागरात इराणी युद्धनौकेला टॉर्पेडो मारून बुडवले, असा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी केला.जहाज आंतरराष्ट्रीय पाण्यात सुरक्षित मानत होते, परंतु अमेरिकन पाणबुडीने त्या जहाजावर हल्ला केला. (सविस्तर वाचा)

Web Title: Maharashtra Marathi News US-Israel Iran war live updates 5 March 2026: PM Narendra Modi, Gulf countries, Donald Trump, Benjamin Netanyahu, Maharashtra assembly Budget Session, Devendra Fadnavis, T20 World Cup, Rajya Sabha Election