इराणमध्ये युद्धाला तोंड फुटले, इस्राइल-अमेरिकेकडून तुफानी हवाई हल्ले, खामेनेईंचं कार्यालय निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:30 IST2026-02-28T12:18:29+5:302026-02-28T13:30:12+5:30
Israel Attack on Iran: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्व परिस्थितीनंतर अखेरीस आज इराणमध्ये युद्धाला तोंड फुटले आहे. आज सकाळपासून इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे.

इराणमध्ये युद्धाला तोंड फुटले, इस्राइल-अमेरिकेकडून तुफानी हवाई हल्ले, खामेनेईंचं कार्यालय निशाण्यावर
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्व परिस्थितीनंतर अखेरीस आज इराणमध्येयुद्धाला तोंड फुटले आहे. आज सकाळपासून इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज येत असून, आकाशामध्ये सगळीकडे काळा धूर पसरला आहे.
इस्राईलच्या संरक्षण मंत्र्यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे इस्राइलकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे इराणवरील या हल्ल्य्यानंतर इराणकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्राइलमध्ये युद्धाचे बिगुल वाजू लागले आहे. तसेच इस्राइलमध्ये शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांना सुरक्षितस्थळी आश्रय घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
Israel Defense Forces @IDF) posts, "Following a situational assessment, it was determined that as of today (Saturday), at 08:00, immediate changes will be made to the Home Front Command Guidelines. As part of the changes, it was decided to shift all areas of the country from Full… pic.twitter.com/UvzIZ4CTaj
— Press Trust of India (@PTI_News) February 28, 2026
दरम्यान, इस्राइलने इराणमधील ३० ठिकाणांना लक्ष्य करून हा क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यांदरम्यान, इस्राइलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांची कार्यालये आणि इराणच्या राष्ट्रपतींनाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यांनंतर इस्राइलने आपली एअरस्पेस बंद केली आहे. तसेच इराणनेही आपली एअरस्पेस बंद केली आहे.