इराणचा यूएईवर भीषण प्रहार! ३४१ क्षेपणास्त्रे आणि १७०० ड्रोन हवेतच नष्ट; मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:47 IST2026-03-22T10:46:20+5:302026-03-22T10:47:03+5:30

केवळ इस्रायलच नव्हे, तर आता इराणने अमेरिकेचे आर्थिक भागीदार असलेल्या देशांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Iran's devastating attack on UAE! 341 missiles and 1700 drones destroyed in the air; War rages in the Middle East | इराणचा यूएईवर भीषण प्रहार! ३४१ क्षेपणास्त्रे आणि १७०० ड्रोन हवेतच नष्ट; मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला

इराणचा यूएईवर भीषण प्रहार! ३४१ क्षेपणास्त्रे आणि १७०० ड्रोन हवेतच नष्ट; मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला

गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाने आता संपूर्ण मध्यपूर्वेला आपल्या विळख्यात घेतले आहे. केवळ इस्रायलच नव्हे, तर आता इराणने अमेरिकेचे आर्थिक भागीदार असलेल्या देशांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त अरब अमिरातीने दावा केला आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने इराणकडून डागलेली तब्बल ३४१ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि १,७०० हून अधिक ड्रोन यशस्वीरित्या पाडले आहेत. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आखाती देशांमध्ये कमालीची भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यूएईच्या डिफेन्स सिस्टमची मोठी कामगिरी

युद्ध सुरू झाल्यापासून इराण सातत्याने यूएईवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी (२१ मार्च) देखील इराणने तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आठ ड्रोन यूएईच्या दिशेने धाडले होते. मात्र, अमिरातीच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालीने हे सर्व हल्ले निकामी केले. "आमची यंत्रणा २४ तास सतर्क असून प्रत्येक धोक्याचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत," असे यूएईच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न?

इराण केवळ लष्करीच नव्हे, तर आर्थिक युद्धही खेळत असल्याचे दिसत आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने आता शेजारील देशांना लक्ष्य केले आहे. यूएई, सौदी अरेबिया, कतार आणि कुवैत हे देश राजकीयदृष्ट्या स्थिर आणि गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानले जातात. यूएईवर हल्ला करून इराण अमेरिकेच्या प्रमुख आर्थिक भागीदाराला थेट इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून अमेरिकेवर दबाव निर्माण करता येईल.

२३ दिवसांचा थरार आणि मोठे नुकसान

या भीषण युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संघर्षात इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि सर्वोच्च नेत्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जगभरात इंधनाचे संकट ओढवले असून कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. एकीकडे युद्ध थांबण्याचे चिन्ह नसताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांत भीषण कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title : ईरान का यूएई पर कथित हमला: मिसाइलें, ड्रोन नष्ट, मध्य पूर्व में तनाव बढ़ा

Web Summary : यूएई का दावा है कि उसने ईरानी मिसाइलों और ड्रोन को सफलतापूर्वक रोका। ईरान द्वारा अमेरिका के आर्थिक सहयोगियों को निशाना बनाने से क्षेत्रीय तनाव बढ़ा, वैश्विक तेल की कीमतों पर असर पड़ा। संघर्ष में हजारों की मौत।

Web Title : Iran's Alleged Attack on UAE: Missiles, Drones Intercepted, Mideast Tensions Soar

Web Summary : UAE claims successful interception of Iranian missiles and drones. Regional tensions escalate as Iran targets America's economic partners, impacting global oil prices. Thousands dead in ongoing conflict.