अवघ्या ५०० सेकंदांत इस्रायल...! इराणने १८ वर्षांपासून लपवून ठेवलेले डान्सिंग क्षेपणास्त्र बाहेर काढले, तेल अवीवमध्ये पळापळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 08:43 IST2026-03-16T08:42:02+5:302026-03-16T08:43:01+5:30

Iran Sejjil Missile Attack: इराणने प्रथमच इस्रायलविरुद्ध सेजिल क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. २००० किमी पल्ला असलेल्या या शस्त्राची ताकद काय आहे? वाचा सविस्तर.

Iran Israel War Sejjil Missile Attack: Israel in just 500 seconds...! Iran reveals missile hidden for 18 years, flees in Tel Aviv... | अवघ्या ५०० सेकंदांत इस्रायल...! इराणने १८ वर्षांपासून लपवून ठेवलेले डान्सिंग क्षेपणास्त्र बाहेर काढले, तेल अवीवमध्ये पळापळ...

अवघ्या ५०० सेकंदांत इस्रायल...! इराणने १८ वर्षांपासून लपवून ठेवलेले डान्सिंग क्षेपणास्त्र बाहेर काढले, तेल अवीवमध्ये पळापळ...

आखाती युद्धाच्या १७ व्या दिवशी इराणने आपल्या ताफ्यातील सर्वात घातक शस्त्राचा वापर करत इस्रायलला मोठा हादरा दिला आहे. इराणने या युद्धात पहिल्यांदाच 'सेजिल ' या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने इस्रायलवर हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्राच्या समावेशामुळे मध्य आशियातील युद्धाने आता अत्यंत भीषण रूप धारण केले आहे.

अमेरिका अन् इराण...! दोघेही एकाच देशावर करतायत हल्ले; दोघांच्या भांडणात हा देश होरपळला...

हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा १२ ते १४ पटीने जास्त वेगाने प्रवास करू शकते. इराणपासून इस्रायलचे अंतर पार करण्यासाठी या क्षेपणास्त्राला केवळ ७ ते ८ मिनिटे (सुमारे ५०० सेकंद) लागतात. याची मारक क्षमता २००० ते २५०० किलोमीटरपर्यंत आहे, ज्यामुळे संपूर्ण इस्रायल आणि युरोपचा काही भाग याच्या टप्प्यात येतो. हे दोन टप्प्यातील 'सॉलिड फ्युएल' वर चालणारे क्षेपणास्त्र आहे. घन इंधनामुळे हे क्षेपणास्त्र अतिशय कमी वेळात प्रक्षेपित करता येते, ज्यामुळे शत्रूच्या रडारला सावध होण्याची संधी मिळत नाही.

इस्रायलची 'आयर्न डोम' यंत्रणा धोक्यात?
इराणचा दावा आहे की, 'सेजिल'चा वेग आणि त्याची दिशा बदलण्याची क्षमता यामुळे इस्रायलची 'आयर्न डोम' किंवा 'अॅरो' ही संरक्षण यंत्रणा भेदणे सोपे आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये हाय-अलर्ट घोषित करण्यात आला असून नागरिकांना बंकरमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इराणी माध्यमांनुसार, सेजिल हा शब्द कुराणातील सुरा अल-फीलमधील एका कथेशी जोडला गेला आहे, ज्यामध्ये सेजिल नावाच्या दगडांनी हल्ला करणाऱ्या शत्रूच्या नाशाबद्दल सांगितले आहे. २००८ मध्ये पहिल्यांदा या मिसाईलची चाचणी घेण्यात आली होती.

युद्धाचा नवा टप्पा
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने किंवा इस्रायलने त्यांचे हल्ले थांबवले नाहीत, तर यापेक्षाही घातक क्षेपणास्त्रांचा वापर केला जाईल. या नव्या शस्त्राच्या वापरामुळे आता जागतिक महासत्तांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Web Title : ईरान का 'डांसिंग मिसाइल', इजराइल में दहशत: 500 सेकंड में हमला!

Web Summary : ईरान ने इजराइल पर 'सेजिल' मिसाइल से हमला किया, जो 500 सेकंड में पहुँच सकती है। इससे इजराइल की रक्षा प्रणाली खतरे में है, मध्य पूर्व में तनाव बढ़ गया है। हाई अलर्ट घोषित।

Web Title : Iran unveils 'dancing missile,' Israel panics: 500 seconds to strike!

Web Summary : Iran launched its 'Sejjil' missile at Israel, capable of reaching in 500 seconds. It threatens Israel's defense systems, escalating Middle East tensions. High alert declared.