अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:02 IST2025-06-27T19:02:40+5:302025-06-27T19:02:57+5:30

Iran-Israel-America: आम्ही इराणला अण्वस्त्रे तयार करू देणार नाही; इस्रायली मंत्र्यांचा इशारा..!

Iran-Israel-America: America's double game! First attacked Iran, imposed sanctions; now will provide 30 billion dollars in aid | अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

Iran-Israel-America:इराण आणि इस्रायलमधील युद्धविरामानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदलले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणी अधिकारी आणि ट्रम्प प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, इराणच्या नागरी ऊर्जा अणुकार्यक्रमासाठी २० ते ३० अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे. शिवाय, त्यावर लादलेल्या निर्बंधांमध्येही सवलत देऊ शकतो. 

पुन्हा इराणवर हल्ला करू
काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगितले जाते की, अमेरिका इराणला थेट पैसे देणार नाही, परंतु अरब देशांमधील त्याच्या मित्रांद्वारे इराणला मदत करतील. यावर आता इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांची प्रतिक्रिया आली आहे. काट्झ यांनी इस्रायली माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, अमेरिका सामील होईल की नाही, हे जाणून न घेता आम्ही इराणविरोधात युद्ध पुकारले. इस्रायलला इराणमधील युरेनियमचे साठे कुठे आहेत, हे माहित नाही, परंतु गरज पडल्यास पुन्हा इराणवर हल्ला करू. 

...तर खामेनी यांना मारले असते
काट्झ पुढे म्हणाले, आम्ही इराणला अण्वस्त्रे आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करू देणार नाही. जर खामेनी आमच्या टार्गेटवर आले असते, तर आम्ही त्यांना नक्की मारले असते. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले होते. इस्रायलने अमेरिकेकडून परवानगी घेतली आहे का? विचारले असता काट्झ म्हणाले, या गोष्टींसाठी आम्हाला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही.

Web Title: Iran-Israel-America: America's double game! First attacked Iran, imposed sanctions; now will provide 30 billion dollars in aid