शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या मिसाइल हल्ल्याची माहिती आधीच लीक?; अमेरिकेच्या 'या' युक्तीने वाचला सैन्याचा जीव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 19:20 IST

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आधुनिक डिटेक्शन यंत्रणेने सैन्यावर होणाऱ्या मिसाइल हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता.

बगदाद - इराणी लष्करी कमांडर सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने इराकमधील अमेरिकेतील सैन्य तळांवर मिसाइल हल्ला केला. यात अमेरिकेचे ८० सैन्य मारले गेले असा दावा इराणकडून करण्यात आला. मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळत कोणत्याही सैन्याच्या मृत्यूचा अधिकृत दुजोरा दिला नाही. अशातच एक बातमी पुढे येतेय की, इराणकडून होणाऱ्या या हल्ल्याची माहिती अमेरिकेला आधीच कळाली होती. नेमकं अमेरिकेला या हल्ल्याची भनक कशी लागली यावर स्पष्टता नाही. 

हल्ल्याच्या काही तासांनंतर इराणी पंतप्रधानांनी सांगितले की मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याची पूर्वकल्पना आधीच होती. इराकी पंतप्रधानांचे प्रवक्त्यांचा दावा आहे की, पंतप्रधान अब्देल तेहरान यांना एक फोन आला होता. यात लष्कर कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराण हल्ल्याच्या तयारीत आहे असं सांगण्यात आलं होतं. इराकच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला ही माहिती दिली आहे याबाबत सध्यातरी याची स्पष्टता नाही. 

..म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती

इराकच्या पंतप्रधानांचे म्हणणं आहे की, आम्हाला सांगण्यात आलं होतं की अमेरिकन सैन्याचा ठिकाणा टारगेट करण्यात आला आहे पण कोणत्या ठिकाणी हा हल्ला होणार याची स्पष्टता नव्हती. मध्यरात्री झालेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून इराकच्या पंतप्रधानांना फोन आला आणि परिस्थितीची माहिती घेण्यात आली. 

'ऑल इज वेल' म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला सूचक इशारा; म्हणाले...

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आधुनिक डिटेक्शन यंत्रणेने सैन्यावर होणाऱ्या मिसाइल हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे सैन्याने बंकरमध्ये लपवण्यात आलं होतं. तातडीच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने इराकमधील सैन्याला धोक्याचा इशारा देऊन अलर्ट केलं. अमेरिकेतील मेरीलँड स्थित फोर्टमेडमध्ये मिसाइल लॉन्चिंगला घेऊन अचूक वेळेची सूचना जमा केली जात होती. डेली मेलच्या रिपोर्टनुसार सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिसाइल ६०० मील दूर असताना सैनिकांना इशारा दिला होता त्यानंतर ते बंकरमध्ये जाऊन लपले. इराणने ऐन अल असद आणि एरबिल बेस यावर डझनभर मिसाइल हल्ला केला. दरम्यान इराणने अमेरिकेचे सैन्य मारले हा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला आहे.        

टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प