शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरप्रश्नी इम्रान खानच्या पक्षाचे नेते आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यासोबत एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 15:36 IST

अमेरिकेने दहशतवादी मौलाना फजलूर रहमान खलील याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.

इस्लामाबाद : दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केल्याचा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे मंत्री अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेल्यासोबत एकाच मंचावर दिसून आले आहेत. 

अमेरिकेने दहशतवादी मौलाना फजलूर रहमान खलील याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. या खलीलसोबत पाकिस्तानच्या नेत्यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानी पत्रकार आसिफ शहजाद यांनीच हा फोटो व्हायरल केला आहे. हा फोटो सोमवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या काश्मीर प्रकरणावरील एका कार्यक्रमाचा आहे. यामध्ये खान यांच्या पीटीआय पक्षाचे पाकव्याप्त काश्मीरचे अध्यक्ष  मसूद खान  आणि सूचना व प्रसारणचे खान यांचे सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांच्यासह पक्षाचे अन्य नेते आहेत. 

या मंचावर हरकत-उल-मुजाहिदीनचा म्होरक्या खलीलही उपस्थित होता. हा फोटो अशावेळी समोर आला आहे जेव्हा एफएटीएफने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा विचार चालविला आहे. इम्रान खानच्या पक्षाला दहशतवाद्यांनीच मदत केली आहे. मात्र, पीटीआयने निवडणुकीत दहशतवाद्यांना पाकिस्तानात थारा देणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर पक्षावर अनेकदा दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे आरोप झाले आहेत. खुद्द खलीलनेही इम्रान खानला समर्थन दिले होते. खलील हा इम्रान खान यांचा खंदा समर्थक असल्याचे म्हटले जाते. धक्कादायक म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला इम्रान खान य़ांनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. यामुळे गेल्या मार्चमध्ये इम्रान खानला टीका सहन करावी लागली होती. 

लादेनशी संबंधखलीलचे अल कायदाचा म्होरक्या लादेनशी संबंध असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर