कोरोनापाठोपाठ आता जगावर 'चापरे विषाणू'चा धोका, अशी आहेत लक्षणे

By बाळकृष्ण परब | Published: November 18, 2020 09:20 AM2020-11-18T09:20:12+5:302020-11-18T09:34:15+5:30

chaparre virus : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात घातलेला धुमाकूळ थांबवण्याचे नाव घेत नसताना आता मानवजातीसमोर अजून एका धोकादायक विषाणूचे संकट उभे राहिले आहे.

Following the corona, there are now symptoms of the 'chaparre virus' in the world | कोरोनापाठोपाठ आता जगावर 'चापरे विषाणू'चा धोका, अशी आहेत लक्षणे

कोरोनापाठोपाठ आता जगावर 'चापरे विषाणू'चा धोका, अशी आहेत लक्षणे

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने चापरे या दुर्मीळ विषाणूचा शोध बोलिव्हियामध्ये लावला आहे या विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे डेंग्यू आणि इबोलासारखी असल्याचे समोर आले आहेहा विषाणू माणसांमधून माणसांमध्ये परसत असल्याने तो साथीचे कारण ठरू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली

न्यूयॉर्क - एकीकडे कोरोना विषाणूने संपूर्ण जगात घातलेला धुमाकूळ थांबवण्याचे नाव घेत नसताना आता मानवजातीसमोर अजून एका धोकादायक विषाणूचे संकट उभे राहिले आहे. तसेच या विषाणूचा फैलाव हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल (सीडीसी) ने याला दुजोरा दिला आहे. चापरे विषाणू असे या विषाणूचे नाव असून, दरम्यान या विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे डेंग्यू आणि इबोलासारखी असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने या दुर्मीळ विषाणूचा शोध बोलिव्हियामध्ये लावला आहे. बोलिव्हियामध्ये या विषाणूच्या संसर्गाचे काही रुग्ण सापडले आहेत. चापरे विषाणूच्या संसर्गामुळे असा ताप येतो की ज्यामुळे ब्रेन हॅमरेजसुद्धा होऊ शकते. हा विषाणू बहुतांशी इबोलाप्रमाणेच आहे. इबोलाला धोकादायक मानले गेले होते. मात्र सुदैवाने त्याच्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य झाले होते.

जगात पुन्हा कोरोनासारखी लक्षावधी लोकांना संक्रमित करणारी साथ येण्यापासून रोखण्यासाठी शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सुरू असलेल्या संशोधनादरम्यान या विषाणूचा शोध लागला आहे. तज्ज्ञांच्या मते बोलिव्हियाची राजधानी ला पाज येथील डी फॅक्टो रुग्णालयातील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना २०१९ मध्ये चापरे विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.



तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा एका विषाणूचे अस्तित्व २००४ मध्ये बोलिव्हियातील चापरे परिसरात दिसून आले होते. हा भाग बोलिव्हियाची राजधानी ला पाजपासून ३७० मैल अंतरावर आहे. याबाबत सीडीसीचे संसर्गजन्य रोज तज्ज्ञ कॅटलिन कोसाबूम यांनी सांगितले की, आमच्या शोधमोहीमेतून या बाबीला दुजोरा मिळाला आहे की, एक मेडिकल रेसिडेंट, एक अ‍ॅम्ब्युलन्स चालक आणि एका आतड्यांच्या तज्ज्ञ डॉक्टराला रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग झाला होता. या तीन पैकी दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. आम्ही केलेल्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार या विषाणूचा संसर्ग हा मानवी शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या माध्यमातून होतो. त्यावर नियंत्रण मिळवणे त्या विषाणूंच्या तुलनेत सोपे आहे. द्यांचा संसर्ग हा श्वासाद्वारे होते. कोविड-१९ चा संसर्ग हा नाकाच्या माध्यमातून होतो.

कोसाबूम यांनी सांगितले की, ज्या रुग्णांना या विषाणूचा संसर्ग झाला होता त्यांना ताप, पोटदुखी, उलटी, हरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर ओरखडे उठणे आणि डोळ्यांमध्ये वेदना होणे, अशी लक्षणे दिसून आले. सध्या या विषाणूच्या संसर्गावर कुठलाही इलाज उपलब्ध नाही.

सध्या या विषाणूला चापरे विषाणू असे नाव देण्यात आळे आहे. या विषाणूबाबत सोमवारी रात्री अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन आणि हायजिनच्या वार्षिक बैठकीत सांगण्यात आले. हा विषाणू माणसांमधून माणसांमध्ये परसत असल्याने तो साथीचे कारण ठरू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच या विषाणूचा संसर्ग हा अनेक वर्षांपासून होत असावा, मात्र त्याची ओळख पटवण्याची गरज वाटली नसावी कारणा याची अनेक लक्षणे ही डेंग्यूप्रमाणेच आहेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

 

Read in English

Web Title: Following the corona, there are now symptoms of the 'chaparre virus' in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.