शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकला दणका! नको ते करायला गेले अन् तोंडावर पडले; ४,७८३ कोटींची भरपाई द्यावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 09:55 IST

फेशियल रेकग्निशनच्या माध्यमातून माहिती गोळा केल्यानं गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग; नुकसान भरपाई द्यावी लागणार

सॅन फ्रान्सिस्को: मोबाईलमधील फेस रेकग्निशन फीचर्सचा वापर करून वापरकर्त्यांची माहिती गोळा करणाऱ्या फेसबुकला जोरदार दणका बसला आहे. वापरकर्त्यांचा बायोमेट्रिक डेटा चोरी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं फेसबुकला तब्बल ४ हजार ७८३ कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. फेसबुकनं फेशियल रेकग्निशन तंत्राच्या माध्यमातून फोटो टॅग करण्याचं फीचर दिलं होतं. तक्रारीनंतर २४ तासांत कंटेट हटवावा लागणार; सोशल मीडियासाठी केंद्राच्या गाईडलाइन्स जारीफेशियल रेकग्निशन तंत्राच्या माध्यमातून नवं फीचर देताना कंपनीनं वापरकर्त्यांची माहिती गोळा केली. यामुळे गोपनीयतेचं उल्लंघन झाल्याचा दावा करत डिसेंबरपर्यंत १५ लाख ७१ हजार ६०८ फेसबुक वापरकर्त्यांनी कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सामूहिक सुनावणी झाली. फेसबुकनं तक्रारदारांना भरपाई देण्याचा आदेश सॅन फ्रान्सिस्कोच्या न्यायालयानं दिला. तुमचं Facebook प्रोफाईल कोण गुपचूप पाहतंय हे माहित्येय का?, 'या' ट्रिक्सच्या मदतीने मिळेल स्टॉकरचा पत्ताफेसबुकनं बायोमेट्रिक माहिती गोपनीयता कायद्याचं उल्लंघन केल्याचं न्यायालयानं सुनावणीदरम्यान म्हटलं. या प्रकरणी तिघांनी आक्षेप नोंदवले होते. त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी होती. अखेर न्यायालयानं फेसबुकला भरपाई देण्याचे आदेश दिले. फेसबुकला तक्रारदारांना ४ हजार ७८३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. गोपनीयतेचं उल्लंघन म्हणून आतापर्यंत कोणत्याही कंपनीला इतकी मोठी भरपाई द्यावी लागलेली नाही. त्यामुळे हा खटला ऐतिहासिक ठरला.सॅन फ्रान्सिस्कोच्या न्यायालयानं दिलेला निकाल फेसबुकसाठी मोठा दणका मानला जात आहे. न्यायालयाच्या निकालानं तक्रारदारांचा मोठा विजय झाला आहे. आता प्रत्येक वापरकर्त्याला ३४५ डॉलर म्हणजेच २५ हजार ३९० रुपयांची भरपाई मिळेल. २०१५ पासून या खटल्याची सुरुवात झाली. हळूहळू फेसबुक विरोधात तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. २०२० पर्यंत फेसबुकनं ४ हजार ४७ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. पण न्यायाधीशांनी हस्तक्षेप केल्यानं ही रक्कम वाढवण्यात आली.

टॅग्स :Facebookफेसबुक