एपस्टीन फाइल्स: हिलेरी क्लिंटन यांची बंद दाराआड होणार चौकशी; अमेरिकेच्या बड्या नेत्यांचे धाबे दणाणले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:48 IST2026-02-27T13:47:53+5:302026-02-27T13:48:47+5:30

'एपस्टीन फाइल्स'ने पुन्हा एकदा अमेरिकेच्या राजकारणात भूकंप आणला आहे.

Epstein Files: Hillary Clinton to be questioned behind closed doors; US top leaders express concern! | एपस्टीन फाइल्स: हिलेरी क्लिंटन यांची बंद दाराआड होणार चौकशी; अमेरिकेच्या बड्या नेत्यांचे धाबे दणाणले!

एपस्टीन फाइल्स: हिलेरी क्लिंटन यांची बंद दाराआड होणार चौकशी; अमेरिकेच्या बड्या नेत्यांचे धाबे दणाणले!

मानवी तस्कर जेफ्री एपस्टीन याच्या मृत्यूला वर्षे उलटली असली तरी, 'एपस्टीन फाइल्स'ने पुन्हा एकदा अमेरिकेच्या राजकारणात भूकंप आणला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन गुरुवारी एका काँग्रेस कमिटीसमोर बंद दाराआड आपला जबाब नोंदवणार आहेत. इतकेच नाही तर, त्यांचे पती आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचीही शुक्रवारी चौकशी होणार असून, यामुळे अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

जेफ्री एपस्टीन आणि त्याची साथीदार गिलेन मॅक्सवेल यांच्या लैंगिक गुन्ह्यांची चौकशी सध्या सुरू आहे. २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात खटल्याची वाट पाहत असतानाच एपस्टीनचा मृत्यू झाला होता. मात्र, अलीकडेच समोर आलेल्या सरकारी कागदपत्रांमध्ये (एपस्टीन फाइल्स) अनेक दिग्गज नेत्यांची नावे समोर आली आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालील 'हाउस ओव्हरसाइट कमिटी' आता क्लिंटन दाम्पत्याची या संदर्भात कसून चौकशी करणार आहे.

सुरुवातीला नकार, नंतर कारवाईच्या भीतीने होकार

सुरुवातीला क्लिंटन दाम्पत्याने या कमिटीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. मात्र, रिपब्लिकन खासदारांनी काँग्रेसचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर, हे डेमोक्रॅटिक पॉवरफुल कपल उत्तरे देण्यासाठी तयार झाले आहे. बिल क्लिंटन यांनी या चौकशीला राजकीय सूडबुद्धी आणि कंगारू कोर्ट असे संबोधले असून, ही सर्व प्रक्रिया केवळ राजकारणाने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या नावावरून आरोप-प्रत्यारोप

या चौकशीवरून अमेरिकेत राजकारणही तापले आहे. डेमोक्रॅट्सचा असा आरोप आहे की, रिपब्लिकन पक्ष केवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांना लक्ष्य करत आहे. ट्रम्प स्वतः एपस्टीनचे जुने सहकारी होते, मात्र त्यांना चौकशीसाठी का बोलावले जात नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प आणि बिल क्लिंटन या दोघांचीही नावे फाइल्समध्ये आहेत, परंतु दोघांनीही २००८ पूर्वीच एपस्टीनशी संबंध तोडल्याचे स्पष्ट केले आहे.

'आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही'

७८ वर्षीय हिलेरी क्लिंटन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, त्यांच्याकडे आणि त्यांच्या पतीकडे लपवण्यासारखे काहीही नाही. "मी मॅक्सवेलला काही वेळा भेटले आहे, पण एपस्टीनशी माझे कधीही महत्त्वाचे संभाषण झाले नाही," असे त्यांनी सांगितले. बिल क्लिंटन यांनी मान्य केले आहे की, २००० च्या सुरुवातीला फाऊंडेशनच्या कामासाठी त्यांनी एपस्टीनच्या विमानाने प्रवास केला होता, मात्र त्यांनी कधीही एपस्टीनच्या खाजगी बेटाला भेट दिली नाही. आता बंद दाराआड होणाऱ्या या चौकशीतून कोणते नवीन खुलासे होतात आणि एपस्टीनच्या काळ्या कृत्यांचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title : एपस्टीन फाइल्स: हिलेरी क्लिंटन से पूछताछ, अमेरिकी नेता चिंतित!

Web Summary : हिलेरी और बिल क्लिंटन एपस्टीन फाइलों पर पूछताछ का सामना कर रहे हैं, जिससे अमेरिकी नेताओं में बेचैनी है। इनकार के बावजूद, वे कांग्रेस के सामने गवाही देने को तैयार हुए। ट्रम्प के एपस्टीन से संबंध भी जांच के दायरे में हैं, जिससे राजनीतिक आरोप लग रहे हैं।

Web Title : Epstein Files: Hillary Clinton Questioned; US Leaders Anxious

Web Summary : Hillary and Bill Clinton face questioning over the Epstein files, causing unease among US leaders. Despite initial denials, they agreed to testify before Congress. Trump's ties to Epstein are also under scrutiny, fueling political accusations and raising questions about the extent of Epstein's network.