शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: २०१२ मध्येच चीनमधील खाणीत वटवाघुळांमुळे कोरोना पसरला, आता वुहानच्या लॅबमधून लीक झाला, संशोधकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 00:01 IST

आतापर्यंत जगभरातील दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावासाठी सुरुवातीपासूनच चीनला जबाबदार धरण्यात येत आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोविड-१९ विषाणूचा फैलाव सात वर्षांपूर्वीच २०१२ मध्ये चीनमधील एका खाणीत झाला होता खाणीत वटवाघुळांची विष्ठा साफ करणारे सहा कामगार निमोनियासारख्या विषाणूमुळे बाधित झाले होते या मजुरांचे सॅम्पल टिश्शू वुहानमधील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते

बीजिंग - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. आतापर्यंत जगभरातील दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावासाठी सुरुवातीपासूनच चीनला जबाबदार धरण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना विषाणू आणि चीनबाबत आता अजून एक धक्कादायक गौप्यफोट झाला आहे.

संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोविड-१९ विषाणूचा फैलाव सात वर्षांपूर्वीच २०१२ मध्ये चीनमधील एका खाणीत झाला होता. या खाणीत वटवाघुळांची विष्ठा साफ करणारे सहा कामगार निमोनियासारख्या विषाणूमुळे बाधित झाले होते. त्यानंतर त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला होता, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान, या घटनेचेही वुहानमधील लॅबशी कनेक्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.

तज्ज्ञांनी मिळवेल्या माहितीनुसार चीनमधील युन्नान प्रांतातील मोजियांग येथील खाणीत सहा कामगार अचानक आजारी पडले होते. हे कामगार खाणीतील वटवाघुळांची विष्ठा साफ करत असत. दरम्यान, या मजुरांवर उपचार करणारे डॉक्टर लू सू यांच्या निदर्शनास आले की, या रुग्णांना तीव्र ताप, सुका खोकला, हाता-पायाचे दुखणे आणि काही रुग्णांना डोकेदुखीचा त्रास होता. ही सर्व लक्षणे आता जगात पसरलेल्या कोविड-१९ ची आहेत. ही खाण वुहानपासून एक हजार किमी दूर आहे.



मात्र तरीही येथील लॅबचा या प्रकणारशी संबंध होता. विषाणूतज्ज्ञ जोनाथन लॅथम आणि मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट अ‍ॅलिसन विल्सन बायोसायन्स रिसॉर्स प्रोजेक्टवर कामत करत आहेत. दरम्यान, त्यांनी ली शू यांचे याबबतचे शोधनिबंध वाचले होते. यामध्ये जे पुरावे देण्यात आले आहेत. त्यानंतर ते या साथीला नव्याने समजून घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या मजुरांचे सॅम्पल टिश्शू वुहानमधील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते, आता तिथूनच हा विषाणू लीक झाला आहे, असा दावा जोनाथन यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी केलेल्या चर्चेत केला आहे. तसेच याच लॅबमध्ये वटवाघुळांच्या मार्फत हा विषाणू पसरल्याचा शोध लागला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव होऊ लागल्यापासूनच चीनमधील वुहान हे आरोपांच्या फेऱ्यात सापडले आहे. येथील प्राण्यांच्या बाजारातून हा विषाणू पसरल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वुहानमधील व्हारयलॉजी लॅबमधून हा विषाणू लीक झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. मात्र हा विषाणू लोकांमध्ये पसरल्यानंतर सापडला होता आधी नाही, असा दावा या लॅबमधील अधिकारी आणि संशोधकांनी केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य