टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 01:47 PM2020-07-28T13:47:40+5:302020-07-28T14:03:38+5:30

टाइम कॅप्सुल म्हणजे काय? ती जमिनीमध्ये का पुरून ठेवली जाते. तसेच अशी टाइम कॅप्सुल कोणत्या धातूपासून तयार केली जाते असे एक ना अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी जमिनीत २०० फूट खाली टाइम कॅप्सूल पुरून ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. हे वृत्त आल्यापासून टाइम कॅप्सुलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. दरम्यान, टाइम कॅप्सुल म्हणजे काय? ती जमिनीमध्ये का पुरून ठेवली जाते. तसेच अशी टाइम कॅप्सुल कोणत्या धातूपासून तयार केली जाते असे एक ना अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न...

टाइम कॅप्सुल म्हणजे काय - Marathi News | टाइम कॅप्सुल म्हणजे काय | Latest national Photos at Lokmat.com

टाइम कॅप्सुल एका कंटेनरप्रमाणे असते. ती विशिष्ट्य धातूपासून तयार केली जाते. तसेच टाइम कॅप्सुल कुठल्याही प्रकारच्या वातावरणाचा सामना करण्यास सक्षम असते. ती जमिनीत खूप खोलवर पुरली जाते. मात्र हजारो वर्षे जमिनीखाली राहिल्यानंतरही टाइम कॅप्सुलला काहीही नुकसान पोहोचत नाही.

म्हणून जमिनीत खोलवर पुरली जाते टाइम कॅप्सुल - Marathi News | म्हणून जमिनीत खोलवर पुरली जाते टाइम कॅप्सुल | Latest national Photos at Lokmat.com

कुठलाही समाज, काळ किंवा देश यांचा इतिहास सुरक्षित ठेवण्यासाठी टाइम कॅप्सुल ही जमिनीत पुरली जाते. हा भविष्यातील लोकांशी केलेला एकप्रकारचा संवाद असतो. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना आताच्या काळाविषयी माहिती मिळू शकते.

टाइम कॅप्सुलच्या निर्मितीसाठी वापरली जाते ही सामुग्री - Marathi News | टाइम कॅप्सुलच्या निर्मितीसाठी वापरली जाते ही सामुग्री | Latest national Photos at Lokmat.com

टाइम कॅप्सुल ही एखाद्या कंटेनरप्रमाणे असते. तिची निर्मिती विशिष्ट्य प्रकारच्या तांब्यापासून केलेली असते. तसेच टाइम कॅप्सुलची तांबी सुमारे तीन फूट असते. या तांब्याचे वैशिष्ट्य म्हणजे शेकडो वर्षे झाली तरी ते खराब होत नाही. त्यामुळे हजारो वर्षांनंतर ही टाइम कॅप्सुल जमिनीतून वर काढली तर त्यातील माहिती सुरक्षित असल्याचे समोर येते.

स्पेनमध्ये मिळाली होती सर्वात जुनी टाइम कॅप्सुल - Marathi News | स्पेनमध्ये मिळाली होती सर्वात जुनी टाइम कॅप्सुल | Latest national Photos at Lokmat.com

३० नोव्हेंबर २०१७ मध्ये स्पेनमधील बर्गोस येथे सुमारे ४०० वर्षे जुनी टाइम कॅप्सुल मिळाली होती. ही टाइम कॅप्सुल येशू ख्रिस्तांच्या रूपात होती. तसेच तिच्यामध्ये १७७७ च्या आसपासच्या काळातील सर्व माहिती जतन करून ठेवण्यात आली होती. आतापर्यंत सापडलेली ही सर्वात जुनी टाइम कॅप्सुल आहे.

भारतात या ठिकाणी पुरून ठेवण्यात आल्या आहेत टाइम कॅप्सुल - Marathi News | भारतात या ठिकाणी पुरून ठेवण्यात आल्या आहेत टाइम कॅप्सुल | Latest national Photos at Lokmat.com

भारतात आतापर्यंत सहा ठिकाणी टाइम कॅप्सुल ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ऐतिहासिक लाल किल्ल्याचाही समावेश आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते लाल किल्ल्यात टाइम कॅप्सुल ठेवण्यात आली होती.

 आयआयटी कानपूर येथेही ठेवली गेली टाइम कॅप्सुल - Marathi News | आयआयटी कानपूर येथेही ठेवली गेली टाइम कॅप्सुल | Latest national Photos at Lokmat.com

आयआयटी कानपूने आपल्या सुवर्णजयंतीच्या कार्यक्रमावेळी आपला ५० वर्षांचा इतिहास जतन करून टाइम कॅप्सुलमध्ये ठेवला होता. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी २०१० मध्ये ही टाइम कॅप्सुल जमिनीखाली ठेवली होती. त्याशिवाय कानपूरमधील चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठातही टाइम कॅप्सुल ठेवण्यात आली होती.

नरेंद्र मोदींवरही झाला होता टाइम कॅप्सुल पुरून ठेवल्याचा आरोप - Marathi News | नरेंद्र मोदींवरही झाला होता टाइम कॅप्सुल पुरून ठेवल्याचा आरोप | Latest national Photos at Lokmat.com

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०११ मध्ये त्यांनी टाइम कॅप्सूल पुरून ठेवल्याचा आरोपी विरोधकांनी केला होता. गांधीनगरमधील महात्मा मंदिराखाली मोदींनी टाइम कॅप्सूल पुरली असून, त्यामध्ये आपल्या कार्याचा उल्लेख करून ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

Read in English