शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये १८ लाख कामगारांवर संक्रांत

By admin | Updated: March 2, 2016 03:42 IST

कोळसा आणि पोलाद क्षेत्रातील १८ लाख कामगारांची कपात करण्याची योजना चीन सरकारने आखली आहे. आर्थिक मंदीची झळ बसलेल्या या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेची

बीजिंग : कोळसा आणि पोलाद क्षेत्रातील १८ लाख कामगारांची कपात करण्याची योजना चीन सरकारने आखली आहे. आर्थिक मंदीची झळ बसलेल्या या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय अध्यक्ष शी जिनसिंग यांनी घेतला आहे. याचाच भाग म्हणून ही कर्मचारी कपात केली जाणार आहे.चीनचे मनुष्यबळ आणि सामाजिक सुरक्षामंत्री सिन येमिन यांनी ही घोषणा केली. मात्र ही कर्मचारी कपात केव्हा करणार हे त्यांनी जाहीर केले नाही. अलीकडील काही दशकांत चीनने आपली अर्थव्यवस्था बळकट करण्याचा भाग म्हणून निर्यातीवर आधारित उद्योग उभारणीस प्राधान्य दिले होते. या उद्योगात सरकारनेच मोठी गुंतवणूक केली होती. या उद्योगातच कमी कुशल असलेल्या कामगारांना मोठा वाव मिळाला होता. त्यातून चीनच्या शहरांमधील अशा कामगारांची संख्या वेगाने वाढली; पण सरकारने क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक केली. त्यामुळे संबंधित उद्योगातही क्षमतेपेक्षा जास्त कामगार भरती झाली. परिणामत: या उद्योगांना आपल्या वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात कमी कराव्या लागल्या व उत्पादनाचा कमी दर याचा अर्थ तोटा. एक प्रकारे सरकारच्या सबसिडीची ही हानीच होती.मात्र गेल्या काही दिवसांपासून चीनने आपल्या धोरणात बदल केला असून, निर्यातीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यापेक्षा देशांतर्गत खप वाढविण्याच्या अर्थव्यवस्थेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. आता जागतिक अर्थव्यवस्था मंदीतून जात असताना चीनला हे धोरण स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही. संपूर्ण जगात चीनची निर्यात सर्वाधिक होती. या निर्यातीच्या आधारेच चीनने गेल्या काही दशकांत सर्वाधिक वेगाने वृद्धी केली होती. (वृत्तसंस्था)मंदीमुळे निर्यातीवर आधारित आर्थिक धोरणे अवलंबणे चीनच्या अंगलट आले आहे. ब्राझील आणि आॅस्ट्रेलिया हे देश प्रामुख्याने चीनला कच्च्या मालाचा पुरवठा करीत होते. त्यात लोखंड आणि कोळशाचे जास्त प्रमाण होते. मात्र मंदीमुळे या देशांनीही मालाचा पुरवठा कमी केला. परिणामत: चीनमधील उत्पादन घटले. स्वत: ब्राझीलमध्येच तीव्र मंदी आली आहे. त्या देशाची निर्यात घसरल्याने जास्त फटका बसला आहे.दुसरीकडे चीनमधील मंदीमुळे पोलाद उद्योगात आलेली मंदी अमेरिकेतील पोलाद उद्योगासाठी फायदेशीर ठरणार आहे. 2015च्या चौथ्या तिमाहीत अमेरिकेतील पोलाद उद्योगाला १.४ अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे, असे अमेरिकी वाणिज्य विभागातर्फे सांगण्यात आले. चीनमधून पोलादाची स्वस्त निर्यात होत असल्याने आपल्याला चौथ्या तिमाहीत तोटा झाल्याचे अमेरिकेबाहेरील प्रथम क्रमांकाच्या आर्सेलर मित्तल या पोलाद कंपनीने म्हटले आहे.