इराण बर्बाद होईपर्यंत हल्ले सुरु ठेवा...; अरब राष्ट्रांची अमेरिकेकडे धक्कादायक मागणी, स्वत: मात्र युद्धात उतरत नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 08:49 IST2026-03-18T08:47:49+5:302026-03-18T08:49:39+5:30

Iran War Update 2026: आखाती देश इराणच्या लष्करी ताकदीला घाबरले आहेत. अमेरिकेने इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करावे अशी त्यांची इच्छा. वाचा सविस्तर.

Continue attacks until Iran is destroyed...; Arab nations demand from America, but they themselves do not enter the war... | इराण बर्बाद होईपर्यंत हल्ले सुरु ठेवा...; अरब राष्ट्रांची अमेरिकेकडे धक्कादायक मागणी, स्वत: मात्र युद्धात उतरत नाहीत...

इराण बर्बाद होईपर्यंत हल्ले सुरु ठेवा...; अरब राष्ट्रांची अमेरिकेकडे धक्कादायक मागणी, स्वत: मात्र युद्धात उतरत नाहीत...

मध्य-पूर्वेतील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. सौदी अरेबिया, युएईसह अनेक अरब देशांनी अमेरिकेला विनंती केली आहे की, इराणची लष्करी ताकद पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय हे युद्ध थांबवू नका. इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि ड्रोन शक्ती कायम राहिली, तर भविष्यात आपल्या ऊर्जा प्रकल्पांना आणि व्यापारी मार्गांना मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती या देशांना वाटत आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार पर्शियन गल्फमधील तेल साठे आणि व्यापारी केंद्रे हे या देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. इराणने 'होर्मुझ'ची सामुद्रधुनी रोखल्यास जागतिक तेल बाजारात हाहाकार माजेल. जर अमेरिकेने इराणला केवळ कमकुवत करून युद्ध थांबवले, तर इराण भविष्यात अधिक आक्रमकपणे या देशांवर हल्ले करेल, अशी भीती आखाती नेत्यांना वाटत आहे. हे देश अमेरिकेला पाठिंबा देत असले तरी, इराणच्या संभाव्य प्रतिहल्ल्याच्या भीतीने ते उघडपणे या मोहिमेत सामील होण्यास कचरत आहेत.

अली लारीजानींचा इस्लामिक देशांवर हल्लाबोल
मृत्यूच्या काही काळ आधी इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी अरब देशांवर जोरदार टीका केली होती. "तुमच्या देशांतील अमेरिकन तळांचा वापर इराणवर हल्ले करण्यासाठी केला जात असताना इराण शांत बसेल अशी तुमची अपेक्षा आहे का? इस्लामिक देशांनी तेहरानला वाऱ्यावर सोडले आहे," असे खडे बोल त्यांनी सुनावले होते.

ट्रम्प यांचा दबाब
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या मोहिमेला 'आंतरराष्ट्रीय वैधता' मिळवून देण्यासाठी अरब देशांनी जाहीरपणे अमेरिकेला पाठिंबा द्यावा, यासाठी दबाव टाकत आहेत. मात्र, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि ओमान यांसारख्या 'जीसीसी' देशांनी अद्याप कोणतीही ठोस सामूहिक भूमिका घेतलेली नाही.

Web Title : अरब देशों ने अमेरिका से ईरान को नष्ट करने का आग्रह किया; खुद युद्ध से बचते हैं।

Web Summary : अरब राष्ट्र गुप्त रूप से अमेरिका से ईरान की सैन्य शक्ति को नष्ट करने का आग्रह करते हैं, ऊर्जा और व्यापार पर भविष्य के हमलों से डरते हैं। अमेरिका का समर्थन करने के बावजूद, वे ईरानी जवाबी कार्रवाई के डर से संघर्ष में शामिल होने से हिचकिचाते हैं। ईरान ने अमेरिकी हमलों के लिए अड्डे की अनुमति देने के लिए अरब देशों की आलोचना की।

Web Title : Arabs urge US to destroy Iran; avoid war themselves.

Web Summary : Arab nations secretly urge the US to obliterate Iran's military might, fearing future attacks on energy and trade. Despite supporting the US, they hesitate to join the conflict, fearing Iranian retaliation. Iran criticizes Arab states for allowing US bases for attacks.