शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सीमेजवळ चीनच्या लष्करी पायाभूत सुविधा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 02:43 IST

तीन वर्षांतील घडामोडी : हवाई तळ, हवाई संरक्षण ठिकाणे, हेलिपोर्टस्ची संख्या दुप्पट

 लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात २०१७ मध्ये सिक्कीमच्या पूर्वेस असलेल्या भूतानचा भाग असलेल्या डोकलाम पेचप्रसंगानंतर आता चीनने त्याचे व्यूहरचनात्मक उद्देश बदलल्याचे दिसते. 

चीनने गेल्या तीन वर्षांत भारतीय सीमेजवळ हवाई तळ, हवाई संरक्षण ठिकाणे आणि हेलिपोर्टस्ची संख्या तब्बल दुप्पट केली आहे. चीनने केलेल्या या लष्करी विस्ताराचा तपशील उपलब्ध झाला आहे. ‘स्ट्रॅटफॉर’ या आघाडीच्या जागतिक जिओपोलिटिकल गुप्तचर संस्थेने याबाबत अहवाल तयार केला आहे. मात्र, तो अद्याप जाहीर झालेला नाही.

चीनने त्याच्या लष्कराच्या पायाभूत सुविधांची भारताला लागून असलेल्या सीमेवर केलेल्या उभारणीची वेळ ही लडाख प्रकरण सुरू व्हायच्या नुकतीच आधीची होती. यातून हे सूचित होते की, सीमेवरून निर्माण झालेला तणाव चीनने फार मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रयत्नांचाच भाग होता, असे स्ट्रॅफफॉरचे वरिष्ठ जागतिक विश्लेषक सिम टॅक यांनी म्हटले. टॅक यांनीच हा अहवाल तयार केला आहे. विशेष म्हणजे चीनच्या या लष्करी पायाभूत सुविधा अजून पूर्ण व्हायच्या आहेत. त्यांचा विस्तार आणि बऱ्याच लष्करी पायाभूत सुविधांचे बांधकाम सध्या सुरू आहे. याचा अर्थ असा की, आज भारताला लागून असलेल्या चीनच्या सीमेवरील चीनच्या लष्करी कारवाया या दीर्घ काळ चालणाºया हेतूंची फक्त सुरुवात आहे, असेही अहवालाने म्हटले. या सगळ्याचे परिणाम भारतासाठी उघड आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्व लडाखमध्ये चीनशी हिंसक संघर्ष उडाला होता. एकदा चीनच्या पायाभूत सुविधांचे काम पूर्ण झाले की चीनच्या कारवायांच्या तीव्रतेला आधीपेक्षाही जास्त पाठिंबा मिळणार आहे.चीनचा रोख भारताकडेचीनने लष्करी पायाभूत सुविधांची जी उभारणी केली आहे तिचा तपशील व उपग्रहांद्वारे त्या व्यवस्थांच्या घेतलेल्या प्रतिमा पाहता भारताच्या सुरक्षेकडे त्याचा थेट रोख आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख