शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियात बोको हरामचा नरसंहार, 100 हून अधिक लोकांनावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 21:04 IST

नायजेरियातील दहशतवादी संघटनेने शेकडो लोकांवर गोळीबार केला.

मैदुगुरी : नायजेरियात बोको हरामची दहशत वाढली आहे. बोको हरामच्या दहशतवाद्यांनी उत्तर-पूर्व नायजेरियात नरसंहार घडवल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी स्थानिक रहिवाशांनी दावा केला की, दहशतवाद्यांनी बेच्छुट गोळीबार केला, ज्यात किमान 100 गावकरी मारले गेले. पोलिसांनी सांगितले की, बोको हरामचे 50 हून अधिक दहशतवादी रविवारी संध्याकाळी मोटारसायकलवरून योबे राज्यातील तरमुवा कौन्सिल परिसरात घुसले आणि गोळीबार करुन अनेक इमारतींना आग लावली.

एकाच गावातील 34 जणांची हत्यामृतांपैकी 34 जण एकाच गावातील होते. या हल्ल्यात आतापर्यंत 100+ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिकांनी सांगितले की, अजून अनेकजण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी योबेमध्ये सर्वात मोठा हल्ला झाला होता. गावकऱ्यांनी सुरक्षा दलांना दहशतवाद्यांची माहिती दिल्यामुळे हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

बोको हराम म्हणजे काय?बोको हराम हा एक दहशतवादी गट आहे, ज्याची स्थापना 2002 मध्ये झाली होती. नायजेरियात शरिया कायदा लागू करणे आणि पाश्चात्य शिक्षणाला विरोध करणे, हा त्याचा उद्देश आहे. या गटाने गेल्या 10 वर्षांत हजारो लोकांचा बळी घेतला आहे, तर लाखो लोकांना आपली घरे सोडून विस्थापित व्हावे लागले आहे. बोको हरामचे हल्ले केवळ ग्रामीण भागातच नाहीत, तर शाळा आणि धार्मिक स्थळांवरही होतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय