जगाला शस्त्रे विकणारा अमेरिका स्वतः 'या' दोन घातक मिसाइल्ससाठी नॉर्वेवर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:57 IST2026-03-10T17:45:59+5:302026-03-10T17:57:04+5:30

America Norway Arms Deal: अमेरिका जगात शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा पुरवठादार असला, तरी विशिष्ट तंत्रज्ञान आणि अचूकतेसाठी तो नॉर्वेसारख्या मित्रदेशावर अवलंबून आहे.

America which sells weapons to the world itself depends on Norway for two deadly missiles NASAMS and NSM | जगाला शस्त्रे विकणारा अमेरिका स्वतः 'या' दोन घातक मिसाइल्ससाठी नॉर्वेवर अवलंबून

जगाला शस्त्रे विकणारा अमेरिका स्वतः 'या' दोन घातक मिसाइल्ससाठी नॉर्वेवर अवलंबून

America Norway Arms Deal: शस्त्रास्त्रे विक्रीच्या बाबतीत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, नॉर्वे हा असा एकमेव देश आहे ज्याकडून अमेरिका सर्वाधिक शस्त्रे खरेदी करतो. २०२१ ते २०२५ या कालावधीत नॉर्वेच्या एकूण शस्त्र निर्यातीपैकी ३३ टक्के वाटा एकट्या अमेरिकेने खरेदी केला आहे. त्यातही दोन घातक क्षेपणास्त्रांसाठी अमेरिका नॉर्वेवर सर्वाधिक अवलंबून आहे. जाणून घेऊया त्या क्षेपणास्त्रांविषयी...

अमेरिका नॉर्वेकडून कोणती २ क्षेपणास्त्रे खरेदी करतो?

१. NASAMS (National Advanced Surface to Air Missile System): हे जमिनीवरून हवेत मारा करणारे प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण कवच आहे. याची ताकद इतकी आहे की, अमेरिकेने आपल्या व्हाइट हाऊस आणि वॉशिंग्टन डीसी सारख्या अतिसंवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेसाठी हे सिस्टीम तैनात केले आहे. हे मध्यम पल्ल्यावरून लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रांना अचूकपणे टिपू शकते.

२. NSM (Naval Strike Missile): हे जगातील सर्वात आधुनिक 'स्टेल्थ अँटी-शिप' आणि 'लँड-अटॅक' क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. याची रेंज १८५ ते २०० किलोमीटर असून, एकदा डागल्यानंतर हे क्षेपणास्त्र स्वतः लक्ष्याचा शोध घेऊन त्यावर हल्ला करते. अमेरिकन नौदल याचा मोठ्या प्रमाणावर वापर करते.

नॉर्वेच्या शस्त्रास्त्रांची मागणी का?

नॉर्वेमध्ये 'Kongsberg' सारख्या प्रगत कंपन्या क्षेपणास्त्र आणि रडार सिस्टीम तयार करतात. नॉर्वेची तंत्रज्ञान प्रणाली अत्यंत अचूक आणि विश्वासार्ह मानली जाते. २०२४ मध्ये अमेरिकेने नॉर्वेच्या कंपनीसोबत ९०४ दशलक्ष डॉलर्सचा मोठा करार केला आहे. नॉर्वे केवळ अमेरिका किंवा नाटो (NATO) देशांनाच आपली शस्त्रे विकतो.

अर्थव्यवस्थेवर परिणाम

नॉर्वेच्या अर्थव्यवस्थेत संरक्षण उत्पादनाचा वाटा सुमारे ८ टक्के आहे. २०२२ मध्ये नॉर्वेने ११.९ अब्ज नॉर्वेजियन क्रोनची शस्त्रे विकली होती, जी २०२४ मध्ये १६.४ अब्ज इतकी वाढली आहे. म्हणजेच जरी अमेरिका जगात शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा पुरवठादार असला, तरी विशिष्ट तंत्रज्ञान आणि अचूकतेसाठी तो नॉर्वेसारख्या मित्रदेशावर अवलंबून आहे.

Web Title : शस्त्र विक्रेता अमेरिका घातक मिसाइलों के लिए नॉर्वे पर निर्भर।

Web Summary : शीर्ष हथियार निर्यातक होने के बावजूद, अमेरिका NASAMS और NSM जैसी उन्नत मिसाइल प्रणालियों के लिए नॉर्वे पर निर्भर है। ये सिस्टम अमेरिकी स्थलों की रक्षा करते हैं और नौसेना संचालन के लिए महत्वपूर्ण हैं। नॉर्वे का रक्षा क्षेत्र इन निर्यातों के माध्यम से अपनी अर्थव्यवस्था को बढ़ावा देता है।

Web Title : US, world's top arms dealer, relies on Norway for missiles.

Web Summary : Despite being a top arms exporter, the US relies on Norway for advanced missile systems like NASAMS and NSM due to their precision and reliability. These systems protect sensitive US sites and are crucial for naval operations. Norway's defense sector significantly boosts its economy through these exports.