शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे केले रद्द
2
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
3
Top Marathi News Live: पंतप्रधानांनंतर आता मुख्यमंत्रीही ॲक्शन मोडमध्ये! सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द
4
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
5
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
6
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
7
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
8
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
9
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
10
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
11
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
12
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
13
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदाणीवरुन रूममेट्स भिडले
14
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
15
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
16
Aparna Yadav: किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
17
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
18
ऐरोलीत खासगीकरणातून ६९ एकरांवर ‘मिनी सिटी’, सिडकोचे प्रयत्न; हजारो कोटींच्या प्रकल्पाने रिअल इस्टेटला मिळेल झळाळी
19
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
20
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा आता व्हेनेझुएलावर डोळा? ‘अमेरिकेचे ५१वे राज्य’ दर्शवणारी 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 09:41 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

America-Venezuela: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेनेझुएलाचा एक नकाशा शेअर केला असून, त्यात त्या देशाला अमेरिकेचे “५१वे राज्य” म्हणून दाखवण्यात आले आहे.

या ग्राफिक फोटोमध्ये व्हेनेझुएलाच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा दाखवण्यात आला असून त्यावर “51st State” असे लिहिलेले दिसत आहे. ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

चीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोस्ट

ही पोस्ट अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा ट्रम्प महत्त्वाच्या शिखर परिषदेसाठी चीन दौऱ्यावर रवाना झाले होते. विशेष म्हणजे, व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रीगस यांनी एक दिवस आधीच “व्हेनेझुएलाने कधीही अमेरिकेचे ५१वे राज्य बनण्याचा विचार केलेला नाही,” असे स्पष्ट विधान केले होते.

त्यांनी असेही म्हटले होते की, जानेवारी महिन्यात अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतरही देशाने अशा कोणत्याही पर्यायाचा विचार केला नाही.

ट्रम्प यांनी आधीही केला होता दावा

विशेष म्हणजे, याआधी सोमवारी ट्रम्प यांनी Fox News  ला दिलेल्या मुलाखतीत व्हेनेझुएलाला अमेरिकेचे नवे राज्य बनवण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत दिले होते. तेलसंपन्न असलेल्या या दक्षिण अमेरिकन देशावर अमेरिकेचा प्रभाव वाढत असल्याचा दावा ते गेल्या काही महिन्यांपासून करत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांची ही भूमिका केवळ राजकीय संदेश नसून, ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील मोठ्या तेलसाठ्यांपैकी एक साठा आहे.

अमेरिकन कंपन्यांसाठी दारे खुली

डेल्सी रोड्रिगस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिका-व्हेनेझुएला संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या सरकारने खनिज आणि तेल क्षेत्र पुन्हा परदेशी कंपन्यांसाठी खुले करण्यास सुरुवात केली असून, विशेषतः अमेरिकन कंपन्यांना गुंतवणुकीची संधी दिली जात आहे. यामुळे अमेरिकेचा आर्थिक आणि राजकीय प्रभाव वेनेझुएलामध्ये वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्हेनेझुएलामध्ये निवडणुकांची मागणी

दरम्यान, व्हेनेझुएलातील विरोधकांनी देशात मुक्त आणि पारदर्शक निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मात्र निवडणुकांबाबत विचारले असता रोड्रिगेज यांनी, “नेमके कधी होईल हे माहिती नाही, पण कधीतरी निवडणुका होतील,” असे उत्तर दिले.

ट्रम्प यांच्या पोस्टमागे नेमका संदेश काय?

ट्रम्प यांच्या पोस्टकडे अनेकजण राजकीय दबाव तंत्र म्हणून पाहत आहेत. काही विश्लेषकांच्या मते, ही पोस्ट अमेरिकेच्या वाढत्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षेचे संकेत असू शकतात. तर काहींच्या मते, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भावना भडकवण्याचा हा प्रयत्न असू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Venezuela Post Sparks Controversy: 51st US State?

Web Summary : Trump's post showing Venezuela as the 51st US state ignited global debate amidst improving US-Venezuela relations and calls for Venezuelan elections.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका