अमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळले, 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 10:04 IST2019-12-01T10:00:59+5:302019-12-01T10:04:41+5:30

अमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे.

9 people died in plane crash in South Dakota in United States | अमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळले, 9 जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळले, 9 जणांचा मृत्यू

ठळक मुद्देअमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी.खराब हवामानामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या दक्षिण डकोटात प्रवासी विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या दक्षिण डकोटा येथे एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. 12 लोक या विमानातून प्रवास करीत होते. चेंबरलेन येथून उड्डाण करुन हे विमान इदाहो फॉल्सकडे निघाले होते. ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या उड्डाणापूर्वी चेंबरलेन आणि दक्षिण डकोटामध्ये बर्फाच्या वादळाचा इशारा देण्यात आला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: 9 people died in plane crash in South Dakota in United States