शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

के. सी. वेणुगोपाल यांनी केले सातव कुटुंबीयांचे सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:42 IST

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली.

हिंगोली :  काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी कळमनुरी येथे भेट देत दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, सातव कुटुंबीयांपैकी एकास राज्यसभेवर घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसे निवेदनही वेणुगोपाल यांना देण्यात आले.    

 वेणुगोपाल हे बुधवारी दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबीयांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना छायाचित्र काढण्यास मनाई करण्यात आली होती. कळमनुरी येथे सातव कुटुंबीयांचे सांत्वन करीत त्यांनी सुमारे वीस मिनिटे चर्चाही केली. अत्यंत गोपनीय चर्चा असल्याने त्या ठिकाणी सातव कुटुंबीयांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यानंतर खासदार सातव यांना श्रद्धांजली अर्पण करून ते दिल्लीकडे रवाना झाले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वेणुगोपाल यांच्या गोपनीय दौऱ्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष आता दिल्लीकडे लागले आहे.

यावेळी वेणुगोपाल यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संपतकुमार, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, आ. अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Rajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसPoliticsराजकारण