शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत हिंगोलीत मुटकुळे विरुद्ध गोरेगावकर लढत रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST

ग्रामीण भागात राजकीय पुढाऱ्यांचे निष्ठावंत म्हणजे, स्वत: नेताच असल्यासारखी निवडणुकीत चुरस निर्माण करतात. या नेतेमंडळींच्या नावावरच अनेक गावांत निवडणुका ...

ग्रामीण भागात राजकीय पुढाऱ्यांचे निष्ठावंत म्हणजे, स्वत: नेताच असल्यासारखी निवडणुकीत चुरस निर्माण करतात. या नेतेमंडळींच्या नावावरच अनेक गावांत निवडणुका होतात. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडी झाली असली तरीही हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावपातळीवर या सर्व पक्षांचे गट-तट कधी कोणाशी सलगी करतील, याचा काही नेम नाही. तरीही ढोबळमानाने हिंगोली व सेनगाव तालुक्यात आ. तान्हाजी मुटकुळे विरुद्ध माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर अशाच लढतींचे चित्र राहणार आहे. कळमनुरी व औंढा तालुक्यातही अनेक ठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा लढती होतात. खा. राजीव सातव व आ. संतोष बांगर यांच्या गटातटांतच या लढतींची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी त्यात भाजपचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. मात्र, किती ठिकाणी हे सांगणे अवघड आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादीचेही परंपरागत गट आहेत.

वसमत तालुक्यातही यापूर्वीचा सामना राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच असायचा. जयप्रकाश दांडेगावकर व जयप्रकाश मुंदडा या नेत्यांतीलच या लढती मानल्या जायच्या. आता याठिकाणीही भाजपकडून आखणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे आ. राजू नवघरे हे बिनविरोधची आवाहने करीत आहेत. तर शिवसेनेला सोबत घेतले तरीही भाजपची मंडळी त्याला राजी होईल, असे दिसत नाही.

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या दृष्टीने शिवसेना वगळता इतर कोणत्याही पक्षाने कोणताही राजकीय कार्यक्रम घेतला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना लढण्यासाठी सूचना तेवढ्या दिल्या. शिवसेनेने मात्र खा. हेमंत पाटील, संपर्कप्रमुख आनंद जाधव, आ. संतोष बांगर यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला.

नेत्यांचे प्राेत्साहन

नेतेमंडळींनी आपापल्या कार्यकर्त्यांना आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या ताब्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायती राहण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरू केले आहे.

जि. प. , पं. स. कडे लक्ष

ग्रा.पं.च्या माध्यमातून जि. प. व पं. स. चे आराखडे आखले जात आहेत. सध्या जि. प. त सेना १५, राष्ट्रवादी १२, काँग्रेस १०, भाजप ११ व अपक्ष असे संख्याबळ असून स्वबळवाढीसाठी लढा सुरू आहे.