शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

घिसडी समाजाचे ऐरणीच्या देवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

हिंगोली : वर्षाचे ३६५ दिवस १० किलोचा घन उचलून लोखंडाचे पाणी करावे तेव्हाच लेकरांबाळांच्या पोटापुरते अन्न मिळते. पण कोरोनामुळे ...

हिंगोली : वर्षाचे ३६५ दिवस १० किलोचा घन उचलून लोखंडाचे पाणी करावे तेव्हाच लेकरांबाळांच्या पोटापुरते अन्न मिळते. पण कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमुळे तेही पदरात पडत नाही. ‘कोरोना महामारी लवकर जाऊ दे अन्‌ लेकराबाळांना भाकरकुटका मिळू दे’ असे म्हणत घिसडी समाजाने ऐरणीच्या देवाला साकडे घातले आहे.

वर्षाचे ३६५ दिवस लोखंडाचे पाणी करावे लागते. तरच घरात कोरकुटका खायला मिळतो अन्‌ कुटुंबाचा गाडा चालतो. गोडधोड तर आमच्या नशिबातच नाही. कोरोनाआधी दिवसाकाठी कसेतरी १०० रुपये मिळायचे. तेही कोरोनाने हिसकावून घेतले आहेत. आजमितीस ५० ते ६० रुपये दिवसाकाठी मिळत आहेत. पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसायही करता येत नाही. ऐरणीच्या देवाने ७० वर्षांमध्ये आजपर्यंत कधी उपाशी ठेवले नाही. मग आताच का असा अंत पाहतो आहे, असा प्रश्नही या समाजाने ऐरणीच्या देवाला विचारला आहे.

१० किलोचा घन उचलून लोखंडावर मारून त्याला आकार देणे हे मोठे काम आहे. जोखीम पत्करून हे काम करावे लागते. थोडी नजर चुकली की सहकऱ्याला दुखापत होण्याची शक्यता असते. मागच्यावर्षी शासनाने थोडीबहुत मदत केली होती. परंतु, यावर्षी शासनाने काहीही मदत केली नाही, असेही या समाजाने सांगितले.

घिसडी समाजाची नाही म्हटली तरी जिल्ह्यात दहा ते बारा कुटुंबे हाच व्यवसाय करतात. हिंगोली शहरात सहा ते सात कुटुंबेही लोखंडाचे पाणी करून उपजीविका भागवितात. बाहेर पडावे तर जाता येत नाही, घरात बसावे तर अन्न मिळत नाही, अशा दुहेरी संकटात समाज सापडला आहे. लोखंड गरम करण्यासाठी कोळसा लागतो. परंतु, महागाईने कळस गाठल्याने तोही वेळेवर मिळत नाही. कधी-कधी अगठी बंद ठेवावी लागते. कोळसा नाही मिळाला तर काडीकचरा आणून अगठी पेटविली जाते. आता शासनाने एक दिवसाआड कामाला परवानगी दिली असली तरी अकरा वाजेपर्यंतच काम उरकून घ्यावे असेही सांगितले आहे. मोठी माणसे उपाशी राहू शकतात. लेकरे उपाशी राहू शकत नाहीत. तेव्हा शासनाने घिसडी समाजाचा विचार करून अन्नधान्य पदरात टाकावे, अशी विनंतीही केली आहे.

उन्हाळ्याचे दिवसही हातचे जात आहेत....

फेब्रुवारी महिन्यापासून शेतीची कामे सुरू होतात. जिल्ह्यातील शेतकरी खुरपे, नांगर, लोखंडी शिवळा, लोखंडी जू, कुणी, विळा आदी शेती विषयक औजारे घेऊन येतात. यातून पोटापुरता पैसा पदरात पडतो. परंतु, कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्यामुळे शेतकरीवर्गही येत नाही. त्यामुळे हाही हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती वाटत आहे. शासनाने घिसडी समाजाचा विचार करून एकवेळचे अन्नतरी द्यावे, अशी मागणी रंगनाथ सोळंके, संतोष सोळंके, राम शिंदे यांनी केली आहे.

फोटो १०