शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

नरसी नामदेव : पैशाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नरसी नामदेव येथे १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ...

नरसी नामदेव : पैशाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नरसी नामदेव येथे १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १७ जणांवर परस्परविरोधी नरसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पहिली फिर्याद शिवाजी बाबाराव पातळे (रा. धनगरगल्ली, नरसी) यांनी दिली आहे. शिवाजी पातळे यांचा भाऊ शेषराव पातळे यांनी व्याजाने घेतलेले पैसे का देत नाहीस या कारणावरून नरसी येथील नऊ जणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर फेकून दिले. शिवाजी पातळे यांच्या भावजयीच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याची पोत, आईच्या गळ्यातील २२ हजार रुपये किमतीची सोन्याची गहू मण्यांची पोत, ५२ हजार रुपये किमतीचे ८० तोळे चांदीचे दागिने असा एकूण एक लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाकूचा धाक दाखवून चोरून नेला. तसेच दरवाजा तोडून खिडकीच्या काचा फोडत मोबाइलवरून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिवाजी पातळे यांच्या फिर्यादीवरून

अरुणा दिलीप काळे, अशोक कठाळू काळे, अशोक काळे यांची पत्नी, मंगळ पांडुरंग काळे यांची पत्नी, दत्ता रामजी पातळे, रामजी उकंडी पातळे, मंजुळा रामजी पातळे, दिलीप कठाळू काळे, मंगल पांडुरंग काळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दुसरी फिर्याद अरूणाबाई दिलीप काळे यांनी दिली. शेषराव पातळे यांना ट्रॅक्टर दुरूस्तीसाठी १ लाख ७ हजार रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हात उसने दिले होते. त्यापैकी ३६ हजार रूपये परत दिले. उर्वरित पैसे देण्याच्या निमित्ताने आरोपींनी घरी बोलावून काठीने मारहाण केली. तसेच अरूणाबाई काळे हिची मुलगी आरती काळे हिच्या दंडास चावा घेऊन जखमी केले. जातीवाचक शिवीगाळ करून आरोपींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अरूणाबाई काळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी पातळे, संतोष पातळे, शेषराव पातळे, बाबाराव पातळे, शेषराव पातळे यांची पत्नी, शिवाजी पातळे यांची पत्नी, संताेष पातळे यांची पत्नी, लताबाई पातळे अशा आठ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, सपोनि गिरी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, सपोनि गिरी करीत आहेत.