शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारीच निघाला मास्टरमाइंड ! भारत फायनान्सच्या कर्मचाऱ्यानेच टिप देऊन लुटायला लावली रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 21:01 IST

सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर अशाच प्रकारचा गुन्हा याच कंपनीच्या कर्मचाऱ्याबाबत घडल्याचे समोर आले.

ठळक मुद्देआधी जिंतूरमध्ये केला प्रयोगफिर्यादीच निघाला आरोपी

हिंगोली : मार्च महिन्यात वसमत तालुक्यातील कौठा पाटी परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटलेली भारत फायनान्स कंपनीची १ लाख ६० हजारांची रक्कम हस्तगत करण्यात वसमत शहर पोलिसांना यश आले. या कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याने टिप देऊन हा प्रकार केला आहे. जिंतूर तालुक्यातील एका प्रकरणात त्याने स्वत:च फिर्याद देऊन असा बनाव केल्याचेही समोर आले आहे.

वसमत शहर ठाण्याच्या हद्दीत कौठा पाटीजवळ ३१ मार्च २०२१ रोजी अभिलाष राजारेडी येनगोड हा भारत फायनान्सचा फिल्ड ऑफिसर कंपनीची १ लाख ६० हजारांची रक्कम घेऊन जात होता. तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अडवून त्यांच्याकडील १ लाख ६० हजारांची रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणाचे सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर अशाच प्रकारचा गुन्हा याच कंपनीच्या कर्मचाऱ्याबाबत घडल्याचे समोर आले. अधिक चौकशी केल्यावर भारत फायनान्सच्या एका कर्मचाऱ्यानेच टिप देऊन हा प्रकार घडवून आणल्याचे समोर आले. यात नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील मानसपुरीचा विश्वजित आनंदा शिनगारपुतळे हा मुख्य सूत्रधार आहे. त्याने खासगी नोकरी करणाऱ्या ओमकार ऊर्फ पमा रामराव फुले याच्या मदतीने कौठा पाटी येथे ही रक्कम लुटली होती.

या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर भारत फायनान्सचाच एक फिल्ड ऑफिसर आकाश रमेश जोंधळे याने टिप दिल्याने ही लूट केल्याचे आरोपींनी कबूल केले. या आरोपींकडून रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत तपासाची माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, फौजदार शिवसांब घेवारे, अभय माकणे, भाग्यश्री कांबळे, कर्मचारी किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, शेख जावेद, जयप्रकाश झाडे, दीपक पाटील यांची उपस्थिती होती.

जिंतूरमध्ये आकाशलाच लुटलेवरील प्रकारची घटना जिंतूर पोलीस ठाणे हद्दीतही घडली होती. यात आकाश जोंधळेच फिर्यादी आहे. तर त्याला लुटणारे इतर कोणी दुसरे नव्हते तर या घटनेतील दोन आरोपीच आहेत. तेथील डाव साधल्याने धाडस वाढल्याने त्यांनी हा नवा प्रकार केला.

शंभर टक्के रक्कम वसूलसहसा चोरीतील १०० टक्के रक्कम वसूल होत नाही. आरोपी खर्चून टाकतात. अथवा तपास अधिकारी त्यावर फार फोकस करीत नाहीत. मात्र यातील १ लाख ६० हजार पूर्णपणे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिस