शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीची मदत, सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी चढले मोबाईल टॉवरवर

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 5, 2024 20:05 IST

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाल्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे.

- दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली): जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत द्या व सरसकट कर्जमाफी करा या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी गोरेगाव येथील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविल्या जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते टॉवरवरुन खाली उतरले.

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाल्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीची मदत देत सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी ५ सप्टेंबर रोजी गोरेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबरदरम्यान संततधार पाऊस झाल्यामुळे जिल्हाभरात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसामुळे झालेली पिकहानी बघता नापिकीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज असतानाही सरकार व प्रशासन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यासारख्या घोषणा करीत असल्याचा आरोप शेतकरी नेते गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सखाराम भाकरे, बालाजी मोरे, सतीश इढोळे, अमोल भाकरे आदींनी केला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे व पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मागण्यांचे लेखी निवेदन दिले आणि आंदोलन मागे घेतले.

मुंबईत करणार अर्धनग्न आंदोलन ...सरसकट कर्जमाफी व अतिवृष्टी अनुदान मदतीच्या मागणीसाठी बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. पुढील चार दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून दखल घेतली गेली नाही तर तुपकर यांच्या आंदोलनाच्या समर्थनात मुंबई येथे अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी