शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 06:02 IST

ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी चक्क गावच विक्रीला काढून सरकारकडे इच्छामरणाची परवानगी मागितल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

सेनगाव : सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारी अशा दुष्टचक्रात सापडलेल्या ताकतोडा (ता. सेनगाव) येथील ग्रामस्थांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी चक्क गावच विक्रीला काढून सरकारकडे इच्छामरणाची परवानगी मागितल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा (ता. सेनगाव) हे सुमारे हजार-बाराशे लोकसंख्येचे गाव. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन. तीही कोरडवाहू. दुष्काळ त्यांच्या पाचवीला पुजलेला. पावसाच्या चार थेंबांवर आलेल्या कपाशी, सोयाबीनवर वर्षभराची गुजराण अवलंबून. मात्र गेली सलग चार वर्षे या गावाकडे पाऊस फिरकलाच नाही. यंदाही जुलै महिना संपत आला तरी पावसाच्या थेंबाची आणि मातीची गाठभेट झालेली नाही. परिणामी पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहेत. ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. मागच्या वर्षात गंभीर दुष्काळ असूनही शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अद्यापही मिळाला नाही. बँकांच्या आडमुठ्या धोरणांमुळे पीककर्जापासूनही शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे खासगी फायनान्स व सावकाराकडे गहाण पडले आहे. सेनगाव तालुक्यातील अनेक ग्रामस्थ व युवक कामाच्या शोधात महानगराकडे वळले आहेत. मात्र ताकतोडा येथील ग्रामस्थांनी भुईच्या ओढीने गाव अद्याप सोडलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, पीकविमा, खासगी फायनान्स व सावकाराकडील कर्ज माफ करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी १८ जुलै रोजी सेनगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मागण्या मान्य कराव्यात, अथवा आम्हाला इच्छामरणाची व गाव विकण्याची परवानगी द्यावी, असा त्यांचा आग्रह आहे.>...तोपर्यंत शाळा, कार्यालये बंद!जोपर्यंत मागन्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत गावातील शासकीय कार्यालये व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर ‘मुख्यमंत्री साहेब, आमचे गाव शेतजमिनीसह विकत घ्या’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ