शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

पिकांना मिळाली संजीवनी; हिंगोली जिल्ह्यात पाऊस परतल्याने शेतकरी सुखावला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 11:43 IST

Rain in Hingoli : गुरुवारी सकाळी आठ वाजेपूर्वीच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देऔंढा व परिसरातील अनेक गावांत रात्री 11 ते 12  पासून पावसाला सुरुवात झाली आहे.

हिंगोली:  जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला आहे. परतलेला हा पाऊस कोमेजून जाणाऱ्या पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.

सेनगावात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. आज सकाळी ही रिमझिम पाऊस सुरू होता. तालुक्यातील कहाकर पुसेगाव गोरेगाव आजेगाव या परिसरात मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. 

कळमनुरी तालुक्यातही पहाटे दोन वाजल्यापासून पाऊस सुरू झाला आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. तालुक्यातील दांडेगाव, नांदापूर, बाळापुर, डोंगरकडा  वाकोडी या परिसरातही चांगला पाऊस झाला. हिंगोलीत काल रात्री 11 वाजेपासून पावसाने सुरुवात केली होती, आज सकाळी हिंगोली शहरासह परिसरातील विविध भागात चांगला पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. औंढा व परिसरातील अनेक गावांत रात्री 11 ते 12  पासून पावसाला सुरुवात झाली आहे. सदर पाऊस हा रिमझिम स्वरूपाचा असल्याने याचा पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे अजूनही हा पाऊस सुरू आहे. येळेगाव सोळुंके जवळा बाजार परिसरातील पाऊस झाला. वसमत तालुक्यातील विविध भागातही पावसाने हजेरी लावली.

गुरुवारी सकाळी आठ वाजेपूर्वीच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये तालुकानिहाय हिंगोली 28, कळमनुरी 28, वसमत 24, औंढा 12, सेनगाव 25 मिलिमीटर अशी नोंद झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीRainपाऊस