शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

World Hypertension Day: काय आहे हायपरटेन्शन? जाणून घ्या या आजाराची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 11:48 IST

अनेकांना या आजाराबाबात माहिती नसते आणि मग ते वेळेवर यावर उपचार करु शकत नाही. अनेकांना तर हा काय आजार आहे हेही माहिती नसतं. 

मुंबई: 17 मे रोजी जगभरात वर्ल्ड हायपरटेन्शन डे साजरा केला जातो. वर्ल्ड हायपरटेन्शन लीगकडून याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम राबविले जातात. अनेकांना या आजाराबाबात माहिती नसते आणि मग ते वेळेवर यावर उपचार करु शकत नाही. अनेकांना तर हा काय आजार आहे हेही माहिती नसतं. 

विचित्र लाईफस्टाईल, डाएट आणि स्ट्रेस यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. यातील एक समस्या म्हणजे हायपरटेन्शन. ज्याला हाय बीपी असेही म्हटले जाते. हायपरटेन्शन आता एक प्रमुख समस्या बनली आहे. यामुळे देशातील लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांची ओळख पटत नसल्याने हा आजार आणखी बळावतो. डॉक्टरांनुसार ही समस्या तणाव, खाण्या-पिण्यातील बदल, दारु, तंबाखू, किडनीशी निगडीत आजाराने किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी झाल्याने होऊ शकते. हा एक अशा गंभीर आजार आहे ज्यामुळे रुग्णाचा मृत्यु होऊ शकतो. 

काय आहे हायपरटेन्शन ?

तुमचं हृदय शरीरातील सर्वच अंगाना रक्त पोहोचवण्याचं काम करतं. ब्लड फ्लो दरम्यान तुमचं हृदय एक प्रेशर तयार करतं. या दबावालाच ब्लड प्रेशर म्हटलं जातं. याने तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. अशावेळी तुमच्या हृदयाला अधिक काम करावं लागतं. सामान्य ब्लड प्रेशर 120/80 एमएमएचजी इतकं असतं. जेव्हा ब्लड प्रेशर 140/90 एमएमएचजीपेक्षा जास्त झालं असेल तर तुम्ही हायपरटेन्शनने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. 

हायपरटेन्शनचे नुकसान

हायपरटेन्शनचे कोणतंही स्पष्ट लक्षण दिसून येत नाही. त्यामुळे अनेकजण याकडे लक्ष देत नाहीत. यामुळे केवळ हृदयालाच नुकसान होतं असं नाहीतर डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या नसांनाही धोका होऊ शकतो. ज्यामुळे तुमची दृष्टी कमजोर होण्याचीही शक्यता असते. तसेच यामुळे किडनीवरही परिणाम होतो. 

हायपरटेन्शनची कारणे

1) स्मोकिंग आणि अल्कोहोलजर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तंबाखू उत्पादनाचे सेवन करत असाल तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. 2) तणावजेव्हा तुम्ही अनेक दिवस स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुमचं ब्लड प्रेशर वाढू लागतं. 3) मीठाचं अधिक सेवनबाहेरचं जेवण किंवा जंक फूडमध्ये मीठ जास्त असल्याने अनेकांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो. त्यामुळे खूप जास्त मीठ खाऊ नये. 4) एक्सरसाइज न करणेव्यायाम न केल्याने तुमच्या शरीरातील नसा प्रभावित होऊ शकतात. जर त्या कमजोर झाल्यास बीपी वाढू शकतो. त्यामुळे रोज व्यायाम करायला हवा. 

हायपरटेन्शनची लक्षणे

- छातीत दुखणे- छातीत भरुन येणे- श्वास घ्यायला त्रास होणे- खूप जास्त थकवा जाणवणे- मान, पाठ, हात किंवा खांदे दुखणे- सतत खोकला येणे- भूक कमी लागणे

हायपरटेन्शनवर उपचार

- तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये हेल्डी फूडचा समावेश करावा लागेल. हिरव्या भाज्या अधिक खायला हव्यात. - सतत बाहेरचं खाणं टाळा- रोज नियमीत व्यायाम करा- एकाच जागेवर जास्तवेळ न बसता शरीराची हालचाल वाढवा- मद्याचे सेवन कमी करा. - स्मोकिंग करु नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स